जळगाव जामोद तालुक्यातील असलेल्या खेर्डा बु येथे दिनांक 26/11/2023 रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान गावातीलच रहिवासी असलेले नेत्रा रवि उगळकार वय 24 वर्षे यांनी त्यांच्या राहत्या घराचे रूममध्ये छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती प्रसाद सुभाष वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला व मृतक नेत्राचे मृत शरीर जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन क्रियेसाठी पाठविण्यात आले. घटनेचा प्राथमिक तपास तपास अधि - पोउपनि अमोल पंडीत यांनी केला. घटनेची फिर्याद यांने जळगाव पोलीस स्टेशनला दिली असता कायमी मर्ग क्र 72/2023 कलम 174 जा.फौ. दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात तपास अधि - पोउपनि अमोल पंडीत हे करीत आहेत.
0 Comments