जळगांव जामोद:-जळगांव जामोद तालुक्यातील कुरणगाड खुर्द हि तरोडा खुर्द तरोडा बु व कुरणगाड खुर्द या तीन गावांची गट ग्रामपंचायत असुन सदस्य संख्या ७ आहे नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयांमध्ये चर्चेत नेहमी राहलेली आहे सरपंच सौ फुलवती बाबुराव पवार विरुद्ध उपसरपंच पती उल्हास झाटे यांनी अप्पर जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचे न्यायालयात सरपंच पती/व परिवारातील सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांना सरपंच यांना अपात्र करण्यात यावे असा अर्ज दाखल करण्यात आला होता विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांनी तहसील कार्यालयामार्फत स्थळ अहवाल मागणी केली या अहवालात स्पष्टपणे अतिक्रमण केल्याचे आढळुन आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांनी अर्जदार यांचे वकील अँड दिपक गव्हांदे व गैर अर्जदार यांचे वतीने अँड मुंडे यांनी युक्तिवाद केला असता अँड दिपक गव्हांदे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959चे कलम 14(ज -3) च्या तरतुदीनुसार सरपंच व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळुन अँड दिपक गव्हांदे यांनी कायदेशीर बाजु मांडली या नंतर मा.अप्पर जिल्हधिकार साहेब बुलडाणा यांनी दिनांक 27/10/2023रोजी सरपंच व सदस्य पदावरून सौ पवार यांना अपात्र करण्यचा आदेश केला आहे
0 Comments