Advertisement

शांती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला सत्कार

 शांती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला सत्कार
बाबुरावसेठ लोखंडकार यांनी घेतले मोठ्या देवीचे दर्शन
प्रतिनिधी खामगाव: 
खामगाव शहरातील आराध्यदैवत आई जगदंबा मोठी देवी शांती उत्सवानिमित्त राजकिय क्षेत्रातील जेष्ठ नेते बाबुरावसेठ लोखंडकार यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. यावेळी उत्सव समिती मंडळाचे वतीने कैलाश तायडे, शिवाजीराव आनंदे, रवीजी आनंदे, टिनु ऐपुरे, प्रसाद गाजुल, यांनी सत्कार केला. यावेळी प्रतिक प्रकाश लोखंडकार इतर सेवाधारी

व भक्तगण मान्यवर हजर होते. ११५ वर्षांची परंपरा असलेल्या शांती उत्सवास २८ ऑक्टोबरपासून खामगावात प्रारंभ झाला आहे. देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा

होतो. या दरम्यान आज ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. उद्या ५ नोव्हेंबर रोजी सत्यनारायण प्रसादाचे वितरण होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी

दुपारी १ वाजता जगदंबा मातेची आरती होवून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होईल. खामगाव शहरात सन १९०८ मध्ये या उत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून हा उत्सव खामगावात पार पडत आहे.

Post a Comment

0 Comments