Advertisement

येणाऱ्या निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे:प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे घर घर चलो अभियानांतर्गत मलकापूर शहरात भाजप कडून पदयात्रा

येणाऱ्या निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे:प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे घर घर चलो अभियानांतर्गत मलकापूर शहरात भाजप कडून पदयात्रा.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविजय २०२४ च्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क से समर्थन घर घर चलो अभियान या कार्यक्रमाचे आयोजन रावेर लोकसभा मतदार संघाच्या मलकापूर विधानसभा मतदार संघात आज ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी, कार्यकत्यांना मार्गदर्शन करून संघटनात्मक बाबी व विविध योजनांचा आधता घेऊन आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकत्यीनी सज्ज रहावे असे आवाहन केले. त्यानंतर मराठा मंगल कार्यालयापासून टेलीफोन कॉलनी रोड, हनुमान चौक ते निमवाडी चौक पर्यंत पदयात्रा काहून व्यापारी, उद्‌योजक, लघुउद्‌योजक, फेरीवाले नागरिक अशा ८९३ जणांशी बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यानंतर पदयात्रेचा समारोप स्थानिक निमवाडी चौक येथे सभेत करण्यात आला. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, खा. रक्षाताई खडसे, उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांनी उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारने ज्या योजना राबविल्या त्या योजनेची माहिती देऊन येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकत्यीनी जोमाने कामाला लागावे व देशात भाजपाची एकहाती सत्ता आणावी असे आवाहन केले. यावेळी मंचावर प्रदेश सरचिटणी विजय चौधरी, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, गणेश मांटे, माजी जि.प. अध्यक्षा सौ. उमाताई तायडे, जिल्हा महामंत्री ब्रम्हानंद चौधरी, रवि अनासपुरे, अमोल आवळे, शालीनीताई बुंदे, डॉ. राजेंद्र फडके यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. चैनसुख संचेती यांनी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व भाजपाच्या पदाधिकान्यांनी सुरु केलेल्या अभियानाला मलकापूर विधानसभा मतदार संघातील जनतेने दिलेला प्रतिसाद हा आजच या मतदार संघात पुन्हा भाजपाचा झेंडा फडकला असल्याचे अधोरेखीत केले असल्याचे सांगितले. या पदयात्रेला यशस्वी करण्याकरीता भाजपाचे विजयराव जाधव, मोहन शर्मा, शिवराज जाधव, शंकर पाटील,ज्ञानदेव वाघोदे, यशकुमार संचेती यांचेसह मलकापूर-नांदुरा विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments