Advertisement

२२जुलै च्या ढगफुटीमुळे पिकांचे नुकसानीच पिक विमा द्या:- वंचित बहुजन आघाडी

२२जुलै च्या ढगफुटीमुळे पिकांचे नुकसानीच पिक विमा द्या:- वंचित बहुजन आघाडी
जळगाव जामोद प्रतिनिधी 
जळगांव जामोद:-दिनांक २०/१२/२०२४रोजी २२जुलै च्या ढगफुटीमुळे पिकांचे नुकसानीची ऑफलाईन कृषी विभाग व ऑनलाइन पिक विमा कंपनीकडे तक्रार केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी, ता.जळगांव जामोद च्यावतीने तालुका कृषि अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले २२जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांचे या ढगफुटीमुळे पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी १ रुपयांमध्ये पिक विमा सुद्धा काढला होता. तसेच ७२ तासाच्या आत काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार सुद्धा केली होती. तसेच कृषी विभागाने सांगल्या प्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्याने कृषी विभागाकडे ऑफलाईन तक्रारी सुद्धा केल्या. परंतु आज सहा महिने झाले परंतु पीक विमा कंपनीकडून ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे एक रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारींचे काय केले? व पिक विमा कंपनीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केव्हा मदत देणार? ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्हाला अपेक्षित असून तात्काळ या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिक विमा कंपनी विरोधात तसेच कृषी विभागा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला निवेदन देते वेळी शहर अध्यक्ष आझम कुरेशी,  सुनिल बोदडे, ता.उपाध्यक्ष वंचित चे युवा नेते प्रकाश भिसे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे,माजी उपसभापती सुपडा बांगर, , क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत अवसरमोल , मनोज अंदूरकर ,संतोष पवार, अमोल तायडे, गुलाबराव आठवले, श्रीराम भिडे,चिंधाजी पवार सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments