Advertisement

काँग्रेस चे डफडे बजाव आंदोलन उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोको व अन्य आंदोलनाचा दिला इशारा

काँग्रेस चे डफडे बजाव आंदोलन उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोको व अन्य आंदोलनाचा दिला इशारा
प्रतिनिधी जळगाव जामोद
एक लढा हक्कासाठी - एक लढा न्यायासाठी.
जळगांव (जा.) शहरातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व घरकुल लाभार्थी नागरिक तसेच कचरा संकलन, साफसफाई व अंगणवाडी च्या समस्या त्वरित निकाली काढाव्या ह्या व ईतर विविध मागण्यासाठी "डफडे बजाओ आंदोलन व मोर्चा" दि 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता दुर्गा चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगांव जामोद येथे धडकला.
    या आंदोलनात पूरग्रस्त तथा शेतकरी यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने सरसकट मदत लवकरात लवकर शेतकरी तथा आपदग्रस्त यांच्या खात्यात वर्ग करावी, पूरपरिस्थितीत अनेक दुकानदाराचे नुकसान झाले त्यांना अद्याप मदत मिळाली नाही असे म्हणत यावेळी डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.
      यापुढे शासनाने येत्या 4 दिवसात कार्यवाही केली नाही तर शासकीय कार्यालयाला टाळे ठोकल्या शिवाय राहणार नाही असा इशारा प्रकाश भाऊ पाटील यांनी दिला .
  यावेळी ऍड.सौ.ज्योतीताई ढोकने आणि महिलांच्या शहराध्यक्ष मीनाताई जळगाव जामोद शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत अनुदानाचे हप्ते विना विलंब देण्यात यावेत व नवीन अर्ज स्विकारण्यात यावे यात हलगर्जी पणा करू नये असे सांगितले.
     या डफडे बजाओ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा. मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, महीला काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सौ.ज्योतीताई ढोकणे, जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुनभाऊ घोलप, महीला शहराध्यक्ष सौ.मिनाताई सातव, डॉ. प्रशांत राजपूत, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, संदिप मानकर, कलीम खान, तसेच अजहर देशमुख, अब्दुल जहीर, प्रमोद तितरे, इमरान भाई, नासीर भाई, विजय हिस्सल, अन्सार बाबूसाहेब अयाज भाई, शमीम भाई, प्रल्हाद राऊत,अनिल इंगळे, जुनेद शेख, देशमुख चाचा, खान घडीवाले, हुसेन राही, गुड्डू भाई, अफरोज भाई, तौफिक भाई, मिलिंद वानखडे, अमोल मानकर,जुबेर पटेल, संतोष गावंडे,धनंजय बंबटकार, राजाभाऊ कोकाटे, सुरेश मानकर, गजानन साबळे, अस्लम भाई, संजय इंगळे, महेंद्र बोडखे, सलीम शहा,ॲड.रतन इंगळे, अमोल वसतकार, दिनेश काटकर, सुरेश वानखडे, कादर खान, विनोद बोपले, गजानन इंगळे, मुजाहि्द,शेख मुस्तफा, मुज्जमील बेग,सै.शारिक, राजा भाई, समु जहागिरदार, चरणसिंग सोळंके,विठ्ठल डांगे, सलीम शहा, शंकर म्हस्के, सरस्वती म्हस्के, ओ.पी.तायडे, गजानन कोथळकर, डॉ.शालिग्राम कपले, श्रीराम मिसाळ,गजानन अवचार, गजानन सुर्यवंशी, सुनिल कळस्कार, नितीन सातव, सचिन जाधव, मंगेश जामोदे, गुड्डू भाई, मुश्ताक भाई , मन्सूर भाई, प्रल्हाद राऊत,बाळू हिस्सल, राजू काळपांडे,सौ.वंदना गिऱ्हे , मारोती कतोरे,सौ.विमल भगत, सौ.भुते. सौ. कोथळकर, सौ. कपले, बिर्जा कौर, जिजाबाई दाभाडे, निता वानखडे , गजानन कतोरे, आदी शहरातील व तालुक्यातील पूरग्रस्त,अतिवृष्टीग्रस्त,घरकुल चे वंचित लाभार्थी तसेच शेतकरी व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments