Advertisement

नरेंद्र ठाकरे खामगाव शहर पोलीस स्टेशनचे नवे ठाणेदार

नरेंद्र ठाकरे खामगाव शहर पोलीस स्टेशनचे नवे ठाणेदार
खामगाव (ता.प्र.) :- खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार
पाटील यांची जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी एका आदेशान्वये बदली केली असून त्यांच्या जागी नरेंद्र ठाकरे हे ठाणेदार म्हणून रूजू झाले आहेत. खामगांव शहर हे संवेदनशील शहर म्हणून राज्यात कुप्रसिध्द आहे.
त्यामुळे या पदाचा पदभार स्विकारण्यास अनेक जण नाराजी व्यक्त करतात.

दरम्यान आज नरेंद्र ठाकरे यांनी पदभार स्विकारला. यापुर्वीचे ठाणेदार

शांतीकुमार पाटील यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे. नरेंद्र ठाकरे हे।

काही वर्षांपुर्वी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार होते. या ठिकाणी कार्यरत असतांना त्यांनी गुन्हेगारांवर वचक

बसविला होता तर सध्या ते विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तिथेही त्यांनी प्रभावी

कामकाज केले. आज ८ डिसेंबरला त्यांनी खामगांव शहर पो. स्टे. ठाणेदार पदाचा कार्यभार स्विकारला असून

खामगांव शहरात सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्याचे मोठे आवाहन त्यांचे समोर आहे.

Post a Comment

0 Comments