*जिल्हा परिषद शाळेच्या गणित उपक्रमांची लंडन भरारी*
*गुणाकाराचा ताळा घेणारी कदमापूर जगातील पहिली शाळा.*
खामगाव (संतोष आटोळे ) - खेडेगावातील जिल्हा परिषदेची खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषदेची शाळा आता चक्क जागतिक पातळीवर पोहोचली आहे.या शाळेत विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सदैव नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.येथील एकही विद्यार्थी गणित गुणवत्तेत मागे राहू नये यासाठी शिक्षक राजेश कोगदे हे गणित विषयात विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उपक्रम राबवित आहेत.लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या वार्की फाऊंडेशन च्या जागतिक पोर्टलवर आतापर्यंत राजेश कोगदे यांचे भागाकार झाला सोपा, गणित किर्तन, गुणाकार पद्धती, डिजिटल शाळा हे उपक्रम प्रकाशित करण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना केवळ एक ते शंभर अंकांचे ज्ञान आहे ते विद्यार्थी विना पाढे पाठांतर कोणताही भागाकार सोडवू शकतात.विशेष म्हणजे येथील शंभर टक्के विद्यार्थी उजळणी लिहितात तसे पाढे लिहितात.येथील विद्यार्थी गुणाकाराचा पडताळा घेऊन आपले उत्तर चूक की बरोबर स्वतःच ठरवितात.आजपर्यंत गुणाकार ताळा ही पद्धती सर्वप्रथम वापरणारी कदमापूर जगातील पहिली शाळा ठरली आहे. आपण आजपर्यंत जे प्राथमिक शिक्षण घेतले आणि विद्यार्थ्यांना देत आहोत त्या अभ्यासक्रमात गुणाकाराचा ताळा घेण्याची कोणतीही पद्धत पाठ्यपुस्तकात उपलब्ध नाही.भागाकाराचा ताळा आपल्या सर्वांना माहीत आहे.कारण पाठ्यपुस्तकातून आपण ते शिकलो आहोत.ज्या उपक्रमांचा जागतिक पातळीवरील शिक्षकांना त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो आणि आजपर्यंत कोणीही ते राबविले नाहीत असेच उपक्रम या जागतिक उपक्रम मंचावर प्रकाशित करण्यात येतात.यामध्ये भारतातील एका जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब, शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब, प्राचार्य डॉ भटकर साहेब, गटशिक्षणाधिकारी उमेश जैन साहेब, केंद्रप्रमुख रवींद्र चेके सर, मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे सर,माझे ग्रामस्थ व माझे दैवत माझे विद्यार्थी यांच्याकडून सदैव प्रेरणादायी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याने मला सतत नाविण्यपूर्ण उपक्रम विकसित करण्यासाठी बळ मिळते.
*राजेश कोगदे*
*शिक्षक,कदमापूर*
0 Comments