दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत सजनपुरी येथे शासन निर्णयानुसार शिवजयंती साजरी न करणे तसेच ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराबाबत दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी, महसूल, खामगाव यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने उपोषणास बसण्याबाबत.
सोनू सिताराम कौशल व समस्त ग्रामस्थ,
रा. सजनपुरी यांनी दिला उपोषणाचा इशारा.
मी खाली सही करणार सोनू सिताराम कौशल, रा. सजनपुरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा, या पत्राद्वारे आपणास कळवू इच्छितो की ग्रामपंचायत सजनपुरी येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णयानुसार शिवजयंती साजरी करण्यात आलेली नाही.
तसेच ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रशासकीय अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याबाबत मी वेळोवेळी पुराव्यासह तक्रारी दिल्या आहेत.
या संदर्भात दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी, महसूल, खामगाव यांना निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
उपोषणाची मुख्य कारणे
१. शिवजयंतीचा अवमान व बनावट पुरावे
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी करण्यात आलेली नाही. याबाबत मी संध्याकाळी ६:४० वाजताचा GPS व्हिडिओ पुरावा सादर केला आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत शिपाई आरिफ याने याची कबुली दिलेली आहे.
असे असतानाही ग्रामसेवकाने NoteCam अॅपच्या माध्यमातून दुपारी २:४४ वाजताचा बनावट (Edited) फोटो सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे.
२. सरपंचांचा खोटा दावा:
सरपंच यांनी नातवाचे निधन झाल्याचे कारण देऊन त्या दिवशी ग्रामपंचायतीत उपस्थित नसल्याचे सांगितले.
मात्र त्याच दिवशी सकाळी ११:१५ वाजता सरपंच गावातील उर्दू शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात उपस्थित असल्याचे फोटो पुरावे उपलब्ध आहेत.
हे पुरावे सादर करूनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
३. ग्रामसेवकाचे संशयास्पद वैद्यकीय प्रमाणपत्र :
ग्रामसेवकाने ४-५ दिवस बेड रेस्टचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले असताना तो २१ तारखेच्या आमसभेत उपस्थित होता.
त्यामुळे हे प्रमाणपत्र संशयास्पद असून कर्तव्यापासून पळ काढण्यासाठी सादर केले असल्याचा संशय निर्माण होतो.
४. जिवे मारण्याची धमकी :
या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे सरपंचांचा मुलगा सय्यद मुज्जफर उर्फ मुन्ना याने मला जिवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये NC No. 0075/2026 (BNS कलम 351 (3)) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मात्र अद्याप आरोपीवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
५. SDO कार्यालयाची दिरंगाई :
दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आपणास निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई झालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
६. सरपंच पदाचा गैरवापर व बेकायदेशीर हस्तक्षेप :
ग्रामपंचायत सजनपुरी येथे सरपंच पद महिला आरक्षणातून निवडून आलेले असताना, सरपंचांचा मुलगा सय्यद मुज्जफर हा स्वतः सरपंच असल्याप्रमाणे वागत असून आपल्या आईच्या पदाचा गैरफायदा घेऊन ग्रामपंचायतीच्या कारभारात बेकायदेशीर हस्तक्षेप करीत आहे.सदर व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांच्या खुर्चीवर बसून कारभार पाहत असल्याचे तसेच हातवारे करून स्वतःला गावाचा "राजा" असल्याप्रमाणे वागत असल्याचे प्रकार घडत आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व प्रकार ग्रामसेवक यांच्या समोर होत असूनही ग्रामसेवक यांनी त्यास कोणताही विरोध केलेला नाही, त्यामुळे ग्रामसेवक यांनी आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
हा प्रकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनधिकृत हस्तक्षेप मानला जातो.
तसेच महिला आरक्षणाचा उद्देश महिलांना प्रशासनात अधिकार देणे हा असताना प्रत्यक्षात दुसऱ्या व्यक्तीकडून कारभार चालविणे हा आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर आहे.
या संदर्भातील फोटो व व्हिडिओ पुरावे माझ्याकडे उपलब्ध असून ते पेनड्राईव्हद्वारे प्रशासनास सादर करीत आहे.
सोबत
१. पोलिस तक्रार (NC) प्रत.
२. सरपंच उर्दू शाळेत उपस्थित असल्याचे फोटो पुरावे.
३. ग्रामसेवकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत.
४. फोटो व व्हिडिओ पुरावे (Pen Drive).
५. आपले सरकार पोर्टलवर दाखल केलेल्या तक्रारींच्या प्रती (मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा व मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या).
प्रतिलिपी
१. पोलीस निरीक्षक, खामगाव शहर पोलीस स्टेशन.
२. पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, खामगाव.
३. गट विकास अधिकारी (BDO), पंचायत समिती, खामगाव.
उपोषणाचा तपशील
वरील सर्व बाबींवर तात्काळ कारवाई न झाल्यास मी खालीलप्रमाणे आमरण उपोषणास बसत आहे.
स्थळ : उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर, खामगाव
तारीख : 30 मार्च २०२६ पासून
वेळ : सकाळी १०:०० वाजेपासून
स्वरूप : आमरण उपोषण
उपोषणादरम्यान माझ्या जीवास अथवा आरोग्यास काही बरे-वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.
आपला विश्वासू
सोनू सिताराम कौशल
रा. सजनपुरी, ता. खामगाव
मो. ९३७५६०३६६६
0 Comments