*संत पहाडसिंग महाराजांचा यात्रा महोत्सव श्रध्दा,भक्ती आणि सामाजिक एकतेचा प्रतीक ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा* यात्रा महोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी घेतले संत पहाडसिंग महाराजांचे दर्शन.
खामगाव/(संतोष आटोळे ) तालुक्यातील पारखेड येथे दरवर्षी प्रमाणेयाही वर्षी संत श्री पहाडसिंग महाराज पुण्यतिथीनिमित्त 16 मार्च ते 23 मार्च 2026 पर्यंत भागवत सप्ताह व 23 मार्च रोजी महाप्रसाद वितरण व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत हभप सोपान महाराज खोंड जवळा पळसखेड यांच्या अमृततुल्य वाणीतून कथा वाचन करण्यात आले. दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 6 ते 7 विष्णु सहस्त्रनाम, सकाळी 7 ते 8 पहाडसिंग महाराज स्त्रोत पठन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8 ते 10 श्री हरिकिर्तन पार पडले. दि.23 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप वैराग्यमुर्ती वासुदेव महाराज शास्त्री वाघजाळ यांचे काल्याच्या किर्तनाने संत श्री पहाडसिंग महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली.तद्नंतर दुपारी 12 वाजता दिंडी,पताका, अश्वासह गावातून पहाडसिंग महाराजांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर यात्रेमध्ये येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पारखेड येथील संत पहाडसिंग महाराज यांच्या मंदिरात जावुन पहाडसिंग महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन दर्शन घ्ोतले.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामागाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,रोहित राजपुत,रामदास गावंडे,विक्रम सोळंके,पवन लांडे,महेश हेलगे,गोपाल हेलगे,वैभव लाहुडकार,विकास राठोड,दत्तात्रय हेलगे,दत्तात्रय देशमुख,रमेश कोळसे,महेंद्रसिंग चव्हाण यांच्यासह पारखेड येथील ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी पारखेड वासीयांच्या वतीने ग्राम पंचायत कार्यालयात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा भव्य गुलाब पुष्पहार व शेला,टोपी देउन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, कलगीतुरा भजनाचे जनक संत पहाडसिंग महाराज यांनी गावो-गावच्या साध्या,भोळया कष्टकरी माणसाला हरिनामाचे महत्व अत्यंत साध्या,सोप्या भाषेत समजावुन सांगितले.संत पहाडसिंग यात्रा महोत्सव हा श्रध्दा,भक्ती आणि सामाजिक ऐकतेचे प्रतीक आहे.संत पहाडसिंग महाराजांनी दाखविलेल्या आदर्श मार्गावर चालण्याचा सर्वांनी मनापासून प्रयत्न करावा असे सांगून त्यांनी यात्रा महोत्सवानिमित्त उत्कृष्ट आयोजन केल्याबदद्ल आयोजक व ग्रामस्थांचे मनापासुन अभिनंदन केले तसेच याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी संत पहाडसिंग महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कलगीतुरा व भजन स्पर्धेच्या पारंपारीक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
यात्रा महोत्सवानिमित्त संत पहाडसिंग महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रो उत्सवानिमित्त 23 मार्च रोजी जवळपास 40 क्विंटल महाप्रसाद तयार करुन पंचक्रोशीतील 15 ते 20 हजार भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.पारखेड येथील यात्रोत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती होती. यात्रा महोत्सवानिमित्त अनेक छोटया-मोठया व्यावसायिकांनी पारखेड येथे दुकाने थाटली होती.
0 Comments