दिनांक २२/०३/२०२६ बायर कंपनीकडून मका बियाणे प्रकरणी पोरज येथील शेतकऱ्यांना न्याय व एकरी 25000 हजार रुपये मिळवून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री मा.ना.श्री प्रतापरावजी जाधव साहेब तसेच शिवसेना युवा नेते अँड अमोल भाऊ अंधारे व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांचा मेहकर येथे सत्कार करताना पोरज येथील शेतकरी बांधव.
केंद्रीय मंत्री मा.श्री.प्रतापरावजी जाधव यांच्या पुढाकाराने पोरज येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागें दि.०५/०२/२०२६
तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर खामगांव येथे BAYER कंपनीच्या निकृष्ट मका प्लॉट बियाण्याविरोधात पोरज ता.खामगांव जि.बुलढाणा येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांना कंपनी वरती थेट 420 गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताच उडवा उडवी चे उत्तर देणारी बायर कंपनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत भरपाई देण्याचे मान्य केले.
शिवसेनेचे ॲड.अमोल अंधारे,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे,पुढाकाराने यशस्वीरीत्या मध्यस्थीमुळे संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघाला झालेल्या नुकसानी भरपाई देण्याचे मान्य केले. व शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी पवार साहेब व तसेच BAYER कंपनी प्रतिनिधी शेतकरी संदीप हेरोडे, देवेंद्र इंगळे, विजय बोराडे, प्रदीप हेरोडे,निलेश वाकोडे, कडूबा शेगोकार, श्याम सकळकळे, अभय बोराडे,चतरसिंग बोराडे, शरद बोराडे, संजय सकळकळे आदी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments