Advertisement

आसलगाव फाट्यावर साईरथ ट्रॅव्हल्सची ऑटोला भीषण धडक; एका महिलेचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी...सौ गीता सोनोने

आसलगाव फाट्यावर साईरथ ट्रॅव्हल्सची ऑटोला भीषण धडक; एका महिलेचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी...सौ गीता सोनोने


बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे नांदुरा रोडवरील कॉटन मार्केटसमोर रविवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणाऱ्या साईरथ ट्रॅव्हल्सने (क्रमांक: GJ 14 W 0541) एका प्रवासी ऑटोला (क्रमांक: MH 19 BJ 2825) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऑटोमधील ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.ऑटोमध्ये चालकासह एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. ट्रॅव्हल्सच्या भीषण धडकेत जयश्री किसन उद्धट (वय ३८, रा. आसलगाव) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गजानन सोळके (वय ४५, रा. आसलगाव) - ऑटो चालक,गोपाल किसन उद्धट (वय १२, रा. आसलगाव)वंदना अनिल मेहंगे (वय ३५, रा. आसलगाव)नंदा प्रकाश डाबेराव (वय ३९, रा. आसलगाव)मंगला भीमराव लोथीया (वय ४५, रा. काजेगाव) गंभीर जखमी झाले असून जखमींना सुरुवातीला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे.अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या भीषण घटनेमुळे नागरिक प्रचंड संतापले असून त्यांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या आणि चालकाला चोप दिला. परिस्थिती तणावपूर्ण असताना ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीएसआय अमोल पंडित, पोलीस हेडकॉन्स्टेबल भागवत उंबरंडे, निलेश पांडे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत,


 यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले.सध्या पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातामुळे आसलगाव आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments