पाणीपुरवठा सुरळीत करा ग्रामपंचायत प्रशासनास सु नगाव येथील महिलांचे निवेदन
महिला आक्रमक .. सौ गीता सोनोने
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जळगाव ते जामोद रोड चे काम चालू असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे पाणीपुरवठा पाईपलाईन चालू असलेल्या कामामुळे तुटलेली आहे दीड ते दोन महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित असल्यामुळे दिनांक 23/3 2026 रोजी स्थानिक पाटील लेआउट मधील एक ते दीड महिन्यापासून पाणीपुरवठा हा बंद आहे त्यामुळे येथील लोकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत येथे जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला असता परंतु ग्रामसेवक हे भेटू शकले नाही व तसेच त्यांना फोन करत असताना फोन उचलत नाही व उडवडीचे उत्तरे देतात असा आरोप येथील स्थानिक महिलांनी केला आहे त्यामुळे आज दिनांक 23 3 2016 रोजी पाटील लेआउट मधील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले त्यामुळे दोन ते तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन ग्रामसेवक यांनी दिले पण ग्रामपंचायत प्रशासनाचे थंड बसत्यातील काम पाहता या पाटील लेआउट मध्ये पाणीपुरवठा हा सुरळीत होणार नाही ही शक्यता टाळता येत नाही त्यामुळे जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आक्रमक पवित्रा घेतल्या जाईल असा इशारा येथील महिलांनी दिला आहे
0 Comments