Advertisement

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना यश - एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष अकोला

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना यश - एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष अकोला


      आगर-: भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आगर, उगवा, भोळ, कंचनपुर, लोणाग्रा, च्या रस्त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.त्यांच्या या अपार प्रयत्नाला यश आले.ऊगवा फाटा आगर पाळोदि लोनाग्रा रेल्वे गेट ते अमानत पूर टाकोळा भोळ सदर रस्त्याचे टेंडर दिनांक 20.3.2026 रोजी ओपन करण्यात आले तसेच दिनांक 24.3.2026रोजी रस्त्याचे डांबरीकरण करण्याला सुरुवात होणार आहे असे मा कार्यकारी अभियंता यांनी सांगितले सदर रस्त्याचे डांबरीकरण करायला सुरुवात झाली असुन सर्व गावकरी मंडळींच्या प्रयत्नना मूळे हे शक्य झाले आखिर गाव संघर्ष समिती स्थापन करून या पूढे विकासा साठी लढा सुरू करून आणि कामे उत्तम दर्जाचे कामे करून घेने हि जबाबदारी संपूर्णपणे प्रत्येक गावातील मंडळीनी आपलेच काम समजून चांगले करून घ्यायचे आहे 


तसेच सदर कामात भ्रष्टाचार होनार नाही याची दक्षता सर्व गावकरी मंडळींना घ्यावी लागेल मि आपनाला विनंती करतो की आपले काम समजून चांगले करून घेणे हि जबाबदारी आपली आहे अशी माहिती एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अकोला यांनी दिली.

Post a Comment

0 Comments