Advertisement

हिवरखेड नगरीत अंक्षदा मंगल कलश यात्रा धूमधडाक्यात संपन्न प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड नगरीत अंक्षदा मंगल कलश यात्रा धूमधडाक्यात संपन्न
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
अयोद्या धाम येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारोह दि 22/1/24 ला आयोजित करण्यात आला 
त्या नीमीत्त ठीकठीकानी संबंधित अक्षता मंगल कलश यात्रा काढन्यात येत असुन याच पाश्वभूमीवर हिवरखेड तालूका तेल्हारा येथे विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या हिदूं संघटने कडून दि27/12/23 ला अक्षता मंगल याञा काढन्यात आली यावेळी देश भक्त संपतराव भोपळे चौक काली पीली स्टॅड जवळ अकोट कडून आलेल्या अक्षता मंगल कलश याञेचा स्वागत करन्यात आले यावेळी वारी येथील ज्ञानेश आश्रमाचे मठाधिष रामायनाचार्य हभप श्री ज्ञानेश्र्वर महाराज वाघ यांनी अक्षता मगंल कलशाचे पुजन केले यावेळी कीरण सेदानी महेद्र भोपळे ईजीनीयर सूरेश नाठे यांनी सूद्दा पुजन केले मगंल कलशाची प्रमूख मार्गाने ढोल ताशाचे गजरात वाजत गाजत मिरवनूक काढण्यात आली 
.. विहिप,बजरंग दल,प्रखंड प्रमुख रवी गांवडे मनिष येनकर,वैभव ईगंळे, शूभम काळे, आदित्य पांडव, प्रथमेश नाठे बंजरगी गौरव हागे ईत्यादी सह सुंदरकांड सेवा समिती,माउली भजन मंडळ तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोबत शेकडो श्रीराम भक्त सामील झाले होते.. मिरवणुकीच्या स्वागता साठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली.पूजा अर्चना करण्यात आली.सदर मिरवणुकीत अकोट येथून आलेले *बजरंगबली*
 सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीचा नियोजित मार्गावरून शांततेत श्रीराम मंदीर येथे समारोप करण्यात आला.
यावेळी हिवरखेड पोलीस स्ठेशनचे ठाणेदार गोंवीद पांडव यांचे मार्गदर्शनाखाली दूय्यम ठाणेदार गोपाल दातीर बीट अमलदार महादेव नेवारे विनोद गोलाईत श्रीहरी साबळे सोळंके सह ,पोलीस पाटील या मिरवनूक प्रंसगी हजर होते

Post a Comment

0 Comments