महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन
नांदुराआज दिनांक १९ शुक्रवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की संजय गांधी निराधार श्रावण बाळ विधवा दिव्यांग बांधवांच्या ज्या काही अनुदानासाठी अर्ज आलेले आहे त्यांच्या अर्जांची लवकरात लवकर दखल घेऊन ते अर्ज पुढील कारवाईसाठी पाठवण्यात यावी जेणेकरून या सर्वांना मिळणारे अनुदान हे त्यांना लवकरात लवकर मिळेल व त्यांचा उदाहरनिर्वाह त्याच्यामधून करता येईल अशा आशयाचे आज निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष भागवत भाऊ उगले शहर अध्यक्ष सागर भाऊ जगदाळे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर वाहतूक सेना तालुका अध्यक्ष बळीराम भाऊ गिरे महादेव खोंड मनसे मीडिया अमोल करुटले ऋषिकेश नाईसे अजय रोकडे दत्ता दिनकर श्रीधर सोनवणे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments