Advertisement

भाजपा सरकारच्या पुतळ्याला फाशी देऊन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाने व्यक्त केला निषेध.

*भाजपा सरकारच्या पुतळ्याला फाशी देऊन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाने व्यक्त केला निषेध.*
          *राज्यातील जनता मतदानरूपातून शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या भाजपा सरकारला फासावर लटकवून संपवेल - प्रसेनजीत पाटिल*
             सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालावण येथे काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्यात आला. त्याचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, राज्याची अस्मिता आहेत. त्यांचा पुतळा उभारताना त्या गोष्टीचा विचार व्हायला हवा. परंतु फक्त प्रसिद्धीसाठी आणि भ्रष्टाचारामुळे या पुतळ्याच बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. या शिवद्रोही भाजपा सरकारने शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला त्यामुळे तो पुतळा पडला. हा शिवाजी राजेंचा खुप मोठा अपमान या राज्यातील भाजपा/शिंदे सरकारने केला. त्यामुळे शिवप्रेमी जनतेच्या भावना दुःखावल्या गेल्या. आज दिनांक 28/8/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस  (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तालुका व शहर कमिटीच्या वतीने तहसील चौक, शिवाजी महाराज पुतळ्या समोर तीव्र आंदोलन करीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला फासावर लटकवत आपला निषेध व्यक्त केला. या राज्यातील शिवाजी महाराजावर प्रेम करणारी जनता येणाऱ्या निवडणूकीत या भाजपा महायुती सरकारला मतदान रूपातून अशीच लटकवून संपवणार असल्याचा घनाघात यावेळी राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटिल यांनी केला.
   यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, महादेव भालतडक, ईरफान खान, सिद्धार्थ हेलोडे, दत्ता डिवरे, अतुल गावंडे,विठ्ठल घुले, मंगल डोंगरदिवे, मनीष गावंडे, विष्णू रोठे, रामा पारस्कर,आकाश जाणे,डिगांबर तिजारे, अभिषेक कवळे,अक्षय कुनगाडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments