Advertisement

मलकापुरला कत्तलखान्यांसह मास विक्रीवर बंदी करा सकल जैन समाजातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मलकापुरला कत्तलखान्यांसह मास विक्रीवर बंदी करा सकल जैन समाजातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे 

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक ७ सप्टेंबरप्रमाणे यावर्षी जैन धर्मियांच्या पर्युषण महापर्वाचे शनिवारी, ३१ ऑगस्टपासून बुधवारी, १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत साजरा होणार आहे. या काळात कत्तलखाने व मास विक्रीवर बंदी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन सकल जैन समाजातर्फे मलकापुरचे उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. पर्युषण महापर्वाचे दरम्यान महत्त्वाचे दिवस शनिवार, ७ सप्टेंबर २०२४ रोजी रविवारी, ८ सप्टेंबर २०२४ आणि बुधवारी, १८ सप्टेंबर २०२४ रोजी मलकापूर शहर व तालुक्यातील सर्व कत्तलखाना, मांस विक्रीसाठा केंद्र बंदकरीता योग्य ती कायदेशिर उपाय योजना करण्यात यावी. शासन परिपत्रकाच्या अवमान करणान्यांवर गुन्हेगारांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. इतर दिवशी
उघड्यावर मांस विक्री करण्यावर बंदी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. 
निवेदन देतेवेळी सकल जैन समाजातील भरत दंड, सुगनचंद आबड, सुहास (बंडू) चवरे, जीवनलाल भंसाली, किरणकुमार चवरे, नरेश कोरडीया, शिरीष बुरड, योगेश भंसाली, सचिन क्षीरसागर, डॉ. योगेश पटनी, सचिन भंसाली, शरद जैन, रूपेश बांगडे, नीरज चवरे, सचिन जैन, मयूर+ जैन, डॉ विजयकुमार डागा, दिशांत चवरे, सुरेश संचेती, गौरव दंड, उमेश रेदासनी, संतोष संचेती, नवीन संचेती, सर्वेश संचेती, अंकित कोरडीया, प्रमोद संचेती यांच्यासह सकल जैन समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments