सूनगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत च्या होणाऱ्या सततच्या तक्रारी व कोणतेही परवानगी नसताना रस्ता खोदणे अशा या ना त्या विषयाला अनुसरून नेहमीच चर्चेत असणाऱ्या सूनगाव ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार असल्याचे निदर्शनास आले आहे सविस्तर असे की सुनगाव येथील प्रकाश विठ्ठल ताडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या घरपट्टी कर हे दरवर्षी ते भरत असतात त्यांनी 14 5 2024 रोजी 1725 रुपये घरपट्टी कर भरून रीतसर पावती घेतली आणि पुन्हा ते 27 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत मध्ये नमुना आठ मागण्याकरिता गेले असता संतोष ताडे या कर्मचाऱ्याने तुझ्याकडे घरपट्टी कर आहे
तो आधी भर त्यामुळे 1825 रुपये कर भरून प्रकाश विठ्ठल ताडे यांनी रीतसर पावती घेतली परंतु कर्मचाऱ्याने कोणतीही शहानिशा न करता पुन्हा घरपट्टी कराची दुसरी पावती का फाडली त्यांना कराची पावती दिली व त्यांनी रीतसर पैसे भरले परंतु तीन ते चार महिन्या अगोदर प्रकाश ताडे यांनी ग्रामपंचायतला कर भरलेला आहे व पुन्हा त्यांना घरपट्टीची पावती 1825 रुपये देण्यात आली त्यामुळे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा निदर्शनास आला आहे जर 14
5 2024 रोजीच्या पावतीची कर भरणा याचे रीतसर रजिस्टर मध्ये नोंद ग्रामपंचायतीने का केली नाही व त्याची नोंदणी हे ग्रामपंचायत मध्ये का केली जात नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून येथील नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार 27 सप्टेंबर रोजी सुनगाव येथील प्रकाश विठ्ठल ताडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तक्रार दाखल केली आहे
0 Comments