*धनगर आरक्षण विरोधी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे-मारो आंदोलन*
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे *खासदार नागेश पाटील आष्टीकर* यांनी २०२४-लोकसभा निवडणुकीत *धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी* करण्यासाठी निवडून आल्यानंतर संसद सभागृहात आवाज बुलंद करण्याचे आश्वासन दिले होते.म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लाखो *धनगर बांधवांनी* खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणले.
मागील २० दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व *धनगर* बांधव अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरून जीवाची बाजी लावत सरकार विरोधात चक्का जाम, रास्तारोको,जेलभरो,मोर्चा, निदर्शने,घेराओ आंदोलन करत आहेत.त्याच प्रमाणे खासदार, आमदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या घरा समोर ढोल बजाओ आंदोलन करून *धनगर* एसटी आरक्षण अंमलबजावणी साठी लेखी पाठिंबा पत्र घेण्याचे ठरले आहे.
परंतु हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी *धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी* करिता लेखी पत्र दिले नाही.उलट *धनगर समाजाचा* अपमान करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला की, "मी धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी करिता कोणतेही पाठिंबा शिफारस पत्र दिले नाही विरोधकांनी माझ्या खासदारांच्या शासकीय लेटर पॅडवर बनावट पत्र टाईप करून खोटी सही करून सदर पाठिंबा शिफारस पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.मी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला कधीच पाठिंबा देणार नाही."
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे *धनगर आरक्षण* विरोधी मानसिकतेचे आहेत हे त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून सिध्द होते.खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना *धनगर समाजाची* ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.
*धनगर आरक्षण* विरोधी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा जाहिर निषेध करून त्यांच्या विरुद्ध *जोडे-मारो आंदोलन* करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी दुपारी १२ वा जिल्हाधिकारी कार्यालय,हिंगोली येथे मोठ्या संख्येने *धनगर बांधवांनी* जमा व्हावे ही नम्र-विनंती.
0 Comments