कृषी महाविद्यालय येथे *स्वच्छता ही सेवा सप्ताह* साजरा
प्रतिनिधी
जळगांव जामोद:
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथे दि.23 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान *स्वच्छ्ता ही सेवा सप्ताह अभियान* राबविण्यात आले. त्याची सुरुवात दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वच्छता अभियान हा संकल्प हाती घेतला व महाविद्यालय परिसरातील वर्ग खोल्या, मैदान, स्वच्छतागृहे, रुग्णालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी विविध स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले.
या अभियानाची सांगता समारोहामध्ये कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वच्छता ही एक काळाची गरज आहे, कारण स्वच्छता सप्ताह अभियान राबविल्यामुळे परीसर स्वच्छ राहतो, आरोग्य निरोगी राहते व रोगराईचे प्रमाण सुध्दा कमी होते. या दिवसामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपल्या परीसरातील जेथे सांडपाणी साचले आहे, त्या पाण्याची विल्हेवाट लावल्याने डासाचे प्रमाण राहत नाही आणि त्यामुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहते.
यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.विशाल तायडे (प्राचार्य उद्यानविद्या महाविद्यालय) यांनी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थांना नवीन प्रेरणा दिली.
यावेळी कृषी /उद्यान विद्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments