Advertisement

खांडवी रोडवरील साई ढाब्याजवळ घडला अपघात.अपघातात वडशिंगी येथील ५५ वर्षिय इसमाचा मृत्यू...

*खांडवी रोडवरील साई ढाब्याजवळ घडला अपघात.अपघातात वडशिंगी येथील ५५ वर्षिय इसमाचा मृत्यू...*

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील मानेगाव खांडवी रोड वरील साई ढाब्याजवळ दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मोठा अपघात  होऊन यामध्ये वडशिंगी येथील रामदास गंगाराम भगत वय ५५ वर्षे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.. याबाबत सविस्तर वृत्त असे की ९ ऑक्टोबर रोजी मानेगाव खांडवी रोडवरील साई ढाब्याजवळ खांडवी कडून येणाऱ्या बोलेरो गाडी क्रमांक एम एच ०४जेके ४८२७ या गाडीने रामदास गंगाराम भगत बसलेल्या पाठवला जोरदार धडक मारली. त्यामुळे ऑटो मध्ये बसलेले रामदास भगत राहणार वडशिंगी तालुका जळगाव जामोद हे चालत्या ऑटो मधून खाली पडले तसेच बुलेरो पिकप च्या पाठीमागून येत असलेल्या महिंद्रा मॅक्झिमो गाडी क्रमांक एम एच २८ व्ही ४५८९ यांनी सुद्धा अँटोला धडक दिली. या अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही वाहने पोलीस स्टेशनला आणून ठेवली.अपघातास कारणीभूत ठरलेल्या दोन्हीही वाहनांचे ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाले. सदर घटनेची फिर्याद मृतक रामदास भगत यांचे भाऊ बाळू गंगाराम भगत यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी आरोपी बोलेरो गाडी क्रमांक एम एच ०४ जेके ४८२७ व महिंद्रा मॅक्झिमो गाडी क्रमांक एम एच २८ व्ही ४५८९ या गाड्यांच्या चालकावर गाडी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने नेऊन रामदास भगत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार दिल्याने ड्रायव्हर यांचे विरोधात अप नंबर ५६६/२०२४ कलम २८१,१०६(१) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल मोहाळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments