Advertisement

मुख्यमंत्री तथा गृह विधी व न्याय मंत्री मुंबई यांना उप विभागीय अधिकारी जळगाव जा यांचे मार्फत किसान एकता महासंघ चे वतीने निवेदन सादर,



मुख्यमंत्री तथा गृह विधी व न्याय मंत्री मुंबई यांना उप विभागीय अधिकारी जळगाव जा यांचे मार्फत किसान एकता महासंघ चे वतीने निवेदन सादर,

22  जुलै 2023 चे अतिवृष्टी ची नुकसान भरपाई अहवालात बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैव्यवहार प्रकरणी आरोपीचा जमीन नामंजूर करा,!!

दिनाक,27/12/2024रोजी  किसान एकता महासंघ चे वतीने मुख्यमंत्री तथा गृह विधी व न्याय मंत्री मुंबई यांना निवेदन सादर केले निवेदनात 22/जुलै 2023 रोजी अतिवृष्टीची मदत संदर्भात तहसीलदार यांनी पोलीस स्टेशन जळगाव जा यांना दिलेल्या तक्रारी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग बुलडाणा यांचे कडे वर्ग केला आहे प्रकरणातील एक ते तीन आरोपीचा जिल्हा सत्र न्यायालय खामगाव व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला,तपास अधिकारी यांनी तलाठी उमेश बिलेवार ,तलाठी माटे,व संगणक परिचालक महादेव पाटील यांना नुकतेच अटक करून न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट जळगाव जा ह्यांचे समक्ष हजर केले असता तपास कामी तिन्ही आरोपींना दिनाक 29/12/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती पणे पूर्ण होण्याकरिता स्वतः गांभीर्याने लक्ष देऊन  प्रकरनी तातडीने कडक कारवाई करावी प्रकरणी संदर्भित गुन्ह्याचा न्याय निवडा लागे पर्यंत आरोपीसह तपासातील सह आरोपीचा सुद्धाजमीन नामंजूर करण्यात यावा,असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनावर महाराष्ट्र प्रभारी देवेंद्र शिह सोमवंशी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधी सेल ऍड,स्वप्निल राजपूत,विदर्भ अध्यक्ष शमीम बप्पू देशमुख,अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र ससाणे,अमरावती विभागीय अध्यक्ष सौ सरला ससाणे महिला जिल्हा अध्यक्ष सौ,तुळसाबाई देवकर,जिल्हा संघटक किशोर काळे,जळगाव जा तालुका अध्यक्ष महादेव हर्मकर,यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती कृषी मंत्री,महसूल मंत्री,जिल्हा अधिकारी बुलडाणा,जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांना देण्यात आल्या,

Post a Comment

0 Comments