*२५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...*
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील पळशी सुपो येथील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. सविस्तर असे की ग्राम पळशी सुपो येथील वैभव रामभाऊ कोकाटे वय २५ वर्ष हा तरुण दिनांक सात डिसेंबरच्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या घरून बाहेर जाऊन येतो असे म्हणून निघून गेला तो परत घरी आलाच नाही. नातेवाईकांनी सगळीकडे वैभव चा शोध घेतला असता वैभव हा मिळून आला नाही. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास वैभव च्या नातेवाईकांनी सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गोराळा धरण परिसरात वैभवची शोधाशोध सुरू केली असता धरणाच्या काठावर असलेल्या पळसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.सदर घटनेची फिर्याद विजय शंकर वक्टे वय ४४ राहणार पळशी सुपो यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहिती मिळताच पीएसआय नितनवरे, बीट जमदार इरफान शेख, सचिन शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतक वैभव ला शवविच्छेदन क्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठवण्यात आले.शवविच्छेदन क्रियेनंतर शोकाकुल वातावरणात वैभवचे अंतिम संस्कार करण्यात आले. वैभव च्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.. मृतक वैभव याने आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार शेख इरफान करीत आहे..
0 Comments