Advertisement

खामगाव तालुका शिवसेनेचा सामाजिक पुढाकार**पीडित चिमुकलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली*

*खामगाव तालुका शिवसेनेचा सामाजिक पुढाकार*
*पीडित चिमुकलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली*
सावरगाव, ता. पातूर येथील एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानवी व संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेचा खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सामाजिक बांधिलकी जपत त्या चिमुकलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. ना. भूमीपुत्र प्रतापरावजी जाधव यांच्या नेतृत्वात तसेच आमदार मा.श्री.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून आणि धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी हिंदू सेवक अमोलभाऊ अंधारे,प्रहार संपर्कप्रमुख मा. गजाननभाऊ लोखंडकार तसेच शिवसेना खामगाव तालुका प्रमुख राजुभाऊ बघे यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळगाव साकर्शा येथील पोतदार प्रेप एज्युकेशन संस्थेच्या वतीने त्या चिमुकलीच्या इयत्ता १२ वी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.


तसेच शालेय शिक्षणासाठी लागणारे गणवेश, पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण पूर्तता संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते तथा पोतदार प्रेप एज्युकेशन संस्थेचे मुख्य संचालक सुशिल माधव पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना शिवसेना खामगाव तालुका प्रमुख राजुभाऊ बघे म्हणाले की, “समाजातील प्रत्येक मुलगी सुरक्षित व शिक्षित राहणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या चिमुकलीवर ओढवलेला प्रसंग अत्यंत वेदनादायी असून अशा कठीण काळात तिच्या कुटुंबाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने आम्ही तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”
तसेच या घटनेतील आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी उपस्थित.बाळू बगाडे, सावरगाव सरपंच घनश्याम राठी,
 शिवसेनेचे पिंटू पाटील धोरण,देवेश लोखंडकार विष्णू कदम,करण छापरवाल,अनुप गायकवाड, धम्मपाल गवई,संदीप राठोड,अभिषेक राठोड, सुजल गव्हाळ,अभय गीते,आदीसह शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments