दि.26/04/2026 रोजी पो.स्टे. जळगांव जामोद येथे फिर्यादी सौ. मिना मनिष तडवी, रा. सुनगांव ता.
जळगांव जा. यांनी रिपोर्ट दिला की, दि. 26/04/2026 रोजीचे 09/30वा. पुर्वी ग्राम राजूरा शिवारातील आसिफ हमीद
मुल्लाजी यांचे शेत धुऱ्यावरील लिंबाचे झाडाजवळ व नदीचे काठावर एक मानवी कवटी अर्धवट जळालेली तसेच
100 मिटर अंतरावर स्त्री जातीचे प्रेत वय अं.20 ते 25वर्षे, उंची 5फुट 4 इंच असे मुंडके नसलेल्या अवस्थेत,
अर्धवट जळालेले, पायामध्ये लाल कथीया रंगाचा पायजामा, गळ्या भोवती काळसर रंगाचा स्कार्फ, गळ्यात
काळ्या मण्यांची व पांढऱ्या धातूची पोथ, पायाजवळ गुलाबी रंगाच्या चप्पलचा जोड अशा वर्णणाचे प्रेत पडलेले
आहे. सदर महिलेचा कोणीतरी अज्ञात आरोपीने, अज्ञात कारणावरुन, अज्ञात हत्याराने जिवे ठार मारून, तिचे शिर
व धड वेगवेगळे करुन, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळून टाकलेले आहे. अशा तक्रारीवरुन पो.स्टे.
जळगांव जामोद येथे अप.क्र. 283/ 2026 कलम 103 (1), 238 भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचे
घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. श्रेणिक लोढा, श्री. आनंद
महाजन उपविपोअ. मलकापूर, पोनि श्री. सुनिल अंबुलकर स्था. गु.शा. बुलढाणा यांनी भेट दिली. सदर गुन्ह्याची
गंभीरता, संवेदनशिलता तसेच जनमानसात निर्माण झालेली भिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश
तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना यातील मृतक महिलेची ओळख पटवून, गुन्ह्याची उकल करून,
आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणेबाबत आदेशित केले होते. प्रकरणी पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांनी
अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपासकामी वेगवेगळे पथके तयार करून सदर पथकांना वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करणे बाबत आदेश दिला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जळगाव जामोद संग्रामपूर लगत जिल्हे अमरावती अकोला तसेच बऱ्हाणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी पथके पाठवून मृत महिलेची ओळख आणि आरोपीचा शोध घेतला. सदर घटनास्थळ मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे पथकांना बऱ्हाणपूर जिल्ह्यातील सर्व भगत पोलीस स्टेशनच्या महिलांचा शोध घेण्यात आला गोपनीय बातमीदार व इतर स्तोत्रांकडून माहिती घेण्यात आली सदर गुन्ह्यांमध्ये नेमण्यात आलेल्या पथकांनी सतत बारा दिवस समांतर तपास केला. दरम्यान दिनांक 09/05 /2026 रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पोलीस स्टेशन खकणार,जिल्हा बुऱ्हाणपूर येथे )01/05/2026 रोजी बापूराम नथू कलमेकर वय 50 वर्षे राहणार खडकी मध्य प्रदेश यांनी त्यांची मुलगी शिवानी बापुराम कलमेकर ( सासरकडील नाव सौ शिवानी प्रकाश भीलावेकर रा. खाऱ्या टेम्भूर,तालुका धारणी,जिल्हा अमरावती हे दिनांक 25 /04/ 2026 रोजी पासून कोणाला काही एक न सांगता घरून निघून गेली असल्याबाबत तक्रार दिलेली आहे. त्याबाबत मिसिंग क्रमांक 41 / 2026 प्रमाणे नोंद आहे. तपासात सदर महिलेची माहिती घेऊन पथकांनी बापूराव नथू कलमेकर वय 55 वर्षे,अजय बापूराव कलमेकर व 27 वर्षे दोन्ही राहणार खडकी तालुका खकणार,जिल्हा बुऱ्हाणपूर, (मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले. नंतर दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांना सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यामध्ये आरोपी यांनी कबूलु केले की महिला ही त्यांची मुलगी/ बहीण शिवानी बापूराम कलमेकर असल्याचे व त्यांनीच तिला जीवे ठार मारल्याची कबुली दिली. तपासामध्ये मृतक शिवानी बापूराव कलमेकर हिचा दिनांक 15/04 /2026 रोजी प्रकाश बाळाराम भिलावेकर राहणार खाऱ्या टेंभुर,तालुका धारणी, जिल्हा अमरावती यांच्यासोबत विवाह झालेला आहे. शिवानी दिनांक 20 /04/ 2026 रोजी सासरहून वडिलांचे घरी माहेरी ग्राम खडकी येथे आलेली होती.दरम्यान दिनांक 23/04 2026 रोजी रात्रीचे सुमारास मृतक शिवानी कलमेकर हिचे चुलत भावासोबत प्रेम असल्याने व ती लग्न होऊन सुद्धा ऐकत नसल्याने वडील बापूराव कलमेकर याने मुलगी मृतक शिवानी हिचे डोक्यात बांबू मारून तिला ठार मारले. त्यानंतर आरोपी यांनी मृतक शिवांनी हिचे प्रेत एक दिवस घरामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वडील बापूराम नथू कलमेकर यांनी मुलगा अजय बापूराम कलमेकर (मृतकचा भाऊ ) दोन्ही रा. खडकी,ता. खकणार यांनी मोटरसायकलने मृतक हिचे प्रेत बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथील ग्राम राजुरा शिवारामध्ये आणून टाकले आरोपी यांनी मृतक हिची ओळख पटू नये म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला. धड व मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले व स्वतःच्या रक्ताने माखलेले कपडे व हत्यारे जंगलात फेकून दिले. सदर घटनेनंतर मृतक शिवानी बापूराव कलमेकर ही सासरहून निघून गेल्याची पोलीस स्टेशन तक्रार दिली असे आरोपींनी तपासात कबूल केले.
गुन्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांनी आरोपी बापूराव नथू कलमेकर वय 55 वर्षे (मृतकाचे वडील) व अजय बापूराम कलमेकर वय 27वर्षे (मृतकाचा भाऊ) दोन्ही राहणार खडकी तालुका खकणार, जि. बऱ्हाणपूर (म. प्र.) यांना पकडून पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी दिलेले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन जळगाव जामोद करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय श्री निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री.श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, अमोल गायकवाड पोलीस अधीक्षक बुलढाणा,श्री आनंद महाजन उप विभागीय पोलिस अधिकारी मलकापूर. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एजाज खान, गणेश पुरुषोत्तम पाटील, पो.कॉ.अजीज परसूवाले, अमोल शेजोळ,मंगेश सनगाळे, अमोल वनारे,दीपक वायाळ,राकेश नायडू, पो.हेड कॉ. समाधान टेकाडे,शिवानंद हेलगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा पो. कॉ. कैलास ठोंबरे तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांच्या पथकाने केली.
0 Comments