Advertisement

जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा धमाका! १० हजारांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जाळ्यात.. सौ गीता सोनोने

जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा धमाका! १० हजारांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जाळ्यात.. सौ गीता सोनोने
 
जळगाव जामोद शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची कीड अद्यापही संपलेली नाही, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन लोकसेवकांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.

या धडक कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे.लाचखोर लोकसेवक१. विश्वजीत विनायक सोनोने (५३) – परिरक्षण भूमापक, वर्ग ३.२. सचिन सदाशिव वाजपे (४८) – मुख्यालय सहाय्यक, वर्ग ३.यांनी तक्रारदार त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉटच्या मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जामध्ये त्रुटी काढून काम अडकवून ठेवण्यात आले होते. या त्रुटींची पूर्तता करून मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने या संदर्भात एसीबी बुलढाणा येथे तक्रार नोंदवली.


आज १२ मे रोजी कार्यालयातच सापळा रचण्यात आला, जिथे १० हजार रुपये स्वीकारताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले.ही यशस्वी कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक रमेश पवार आणि विलास गुसिंगे पोलीस अंमलदार, दीपक जाधव (पोहेकाँ), अमोल झिने (पोकाँ), शैलेश सोनवणे (पोकाँ), रंजित व्यवहारे, पंढरी शेळके,चाकाँ.अर्शद शेख,नापोकाँ: नितीन शेटे या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.जर कोणी लोकसेवक कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याशी ०७२६२-२४२५४८, व्हॉट्सॲप क्रमांक ९४०५०११९५४ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments