परभणी घटनेच्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा
बहुजन समाजाचे गृहमंत्री यांना निवेदन
देऊळगाव राजा : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दोषींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची मालमत्ता सरकार जमा करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे येथील बहुजन समाजाने राज्याचे गृहमंत्री यांच्या कडे केली आहे.
राज्यातील परभणी येथे गत १० डिसेंबर रोजी समाजकंटकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेले संविधान शिल्पाची विटंबना केल्याचे कृत्य घडले. या घटनेचा समस्त बहुजन समाजातर्फे निषेध करण्यात आला. या घटनेतील दोषी समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची संपत्ती सरकार जमा करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देताना युवानेते आकाश कासारे,पत्रकार मुशीरखान कोटकर,मिलिंद खरात,म.नासेर जनतासेवा, चंद्रभान झिने, बाबासाहेब कासारे,नासिर शाह गुलाब शहा,अतिश खरात,रवी पिंपळे,राजू अली गुलाब अली, नितीन पिंपळे,शेख गौस, अमोल पाखरे, मुन्ना ठाकूर यांच्यासह तालुक्यातील समस्त बहुजन युवकांची उपस्थिती होती.
0 Comments