*पत्रकारदिनी पत्रकारावर हल्ला; प्रेमकुमार राठोड यांना मारहाण*
चंद्रभान झिने देऊळगाव राजा
देऊळगांव राजा : मागील काही महिन्यांपासून गल्लीत येणाऱ्या रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकून रस्ता अडविणाऱ्यास जाब विचारणे एका पत्रकारास जीवावर बेतले. पत्रकार प्रेम कुमार राठोड वर त्यांच्या मोहल्यातील राहणार बुधवत यांनी रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केल्या प्रकरणी देऊळगाव राजा तालुक्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
दि.६ जानेवारी पत्रकार दिनी गोडबोले लेआउट मध्ये राहणारे संपादक प्रेम कुमार राठोड यांना त्यांच्याच मोहल्ल्यातील आरोपी गणेश प्रल्हाद बुधवत ने रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली. पत्रकार राठोड सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू भर्ती असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपवून ते जेव्हा दुपारी १ वाजेच्या दरम्यान घरी आले, तेव्हा बुधवत यांनी रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे त्यांना घरापर्यंत गाडी नेणे मुश्किल झाले होते. यापूर्वीही कित्येकदा राठोड आणि गल्लीतील अनेकांनी बुधवत यांना सदर साहित्य हटवण्याबाबत विनंती केली होती. आज पुन्हा एकदा राठोड यांनी बुधवताना विचारणा केली. जर आपण सदर साहित्य हटविले नाही तर मला नाईलाजास्तव बातमी प्रकाशित करावी लागणार आहे. असे सांगताच आरोपी गणेश बुधवत याने प्रेमकुमार राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बुधवत यांचे कुटुंबीयसुद्धा राठोड यांना शिवीगाळ करीत मारहाण करीत होते. यात राठोड यांच्या दोन्ही हातांना, छातीला दुखापत झाली. राठोड सध्या बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील आयसीयू मध्ये भर्ती आहेत. दरम्यान याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देऊळगाव राजा तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. याप्रसंगी मुशिर खान कोटकर, सुषमाताई राऊत, गजानन तिडके, अर्जुन कुमार आंधळे, सन्मती जैन, अशोक डोईफोडे, अशरफ पटेल, प्रशांत पंडित, पूजा कायंदे, प्रदीप हिवाळे, सुरज गुप्ता, अमोल बोबडे, किरण वाघ, चंद्रभान जिने, मोहम्मद जमील आदि पत्रकार उपस्थित होते.
0 Comments