देऊळगाव राजा परीक्षेत्रातील नियत क्षेत्र बोरखेडी बावरा मधील १००% रोपे जळून खाक - वनपरीक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष
जिवंत रोपाची बोगस १००% टक्केवारी दाखवून शासनाच्या केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये त्यांनीच स्टंट केला असल्याची शक्यता
तक्रारीत उपवन सरंक्षक अधिकारी बुलढाणा ह्या पाठीशी घालता असल्या चे ही सांगितले
देऊळगाव राजा परीक्षेत्र कार्यालया अंतर्गत नियत क्षेत्र देऊळगाव राजा अंतर्गत बोरखेडी बावरा मधील वन खंड क्र. ४४१ मधील रमना क्षेत्र अंदाजे ५० हेक्टर मधील २५ हेक्टर सिंचित रोपवनातील १००% रोपे जळून शासनाचा करोडो रुपयाचा खर्च वाया गेला आहे त्या मुळे वनीकरण भरगच्च कार्यक्रम सन २०२२ ते २०२३ लागवड झालेले मिश्र प्रजातीचे १५ व १० हेक्टर मध्ये लागलेली आग ही जाणून बुजून भ्रष्टाचार दडपविन्या च्या उद्देशाने अंगार आटोक्यात न आणता रोपवनातील झाडे वन्य प्राणी जळल्या मुळे जाणीव पूर्वक किंवा निष्काळजी पनाने कर्तव्यात कसूर केल्याचे वनपरीक्षेत अधिकारी यांच्या कडून दिसून येत आहे व तसेच मात्र त्या प्लांटेशन मध्ये ५% टक्के रोपे लावली आसून १००% टक्के रोपाची टक्केवारी दाखवून बोगस बिले काढल्यामुळे त्या क्षेत्रावर जळाइ, जाळरेषा, आळे फावडने, टँकर ने पाणी देणे ही कामे न करता बोगस बिल काढून निधी वितरक अधिकाऱ्याचे मार्च मध्ये अकाउंट डिव्हिजन मध्ये जमा झाल्यामुळे पुढील भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनीच संबंधिता मार्फत हा प्रकार केला असल्याचे नाकारता येत नाही व घटणास्थळी आग
आटोक्यात आणण्यासाठी वनरक्षक व वनपाल हजर होते मात्र अंगारीची माहिती मिळून ही वनपरीक्षेत्र अधिकारी तात्काळ हजर झाले नाही व अंगार आटोक्यात आणण्यासाठी कुठले ही प्रयत्न न करता कुठली ही मनुष्य बळ न देता व यंत्र सामुग्रीचा मदत देण्याचे काम केलें नाहीत असे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या दाट चर्चेवरुण समोर येत आहे व घटनाष्ठळ जळीत क्षेत्रा वरून दिसून येते सदरील घटनेची तक्रार मुख्य वनसरंक्षक अधिकारी जयोती बॅनर्जी मॅडम अमरावती यांना दिली असून तक्रार कर्ते १)रफीक लतीफ सय्यद २) गजानन बाबुराव कहाळे यांनी केली असून संबंधित वनपरीक्षेत्र अधिकारी दे, राजा यांच्या कडून आतापर्यंत झालेला संपूर्ण खर्च वसुल करण्यात यावा व त्याच तात्काळ निलंबन करून पुढील चौकशी निष्पक्ष व्हावी अशी मागणी केली आहे मात्र आता लक्ष वेधले आहे कि संबंधीत चौकशी अधिकारी काय कारवाई करणार आहे
अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका, सौ सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी
दे,राजा,/बुलडाणा
0 Comments