Advertisement

देऊळगाव राजा हायस्कूलच्या अगस्त ची राष्ट्रीय स्तरावर धडक चंद्रभान झिने देऊळगाव राजा

*देऊळगाव राजा हायस्कूलच्या अगस्त ची राष्ट्रीय स्तरावर धडक* 
 चंद्रभान झिने देऊळगाव राजा 
देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवंत व गौरवशाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर धडक मारून आपल्या कर्तुत्वाची छाप अनेकदा उमटवली आहे. इयत्ता सातवी चा विद्यार्थी अगस्त वैशाली बाळकृष्ण तिडके याने हरबल मॉस्किटो रिपेलेंट या प्रयोगातून जीएमआरटी खोडद पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनी साठी आपला प्रयोग सादर केला. या प्रयोगाची राज्यस्तरावरून आता राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने निवड झाली आहे. 

दिनांक 20 मे 2025 रोजी होणाऱ्या जीएमआरटी खोडद पुणे येथील सेरेमनी साठी अगस्त्य याच्या अभिनव प्रयोगाची ऑनलाइन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. हरबल मॉस्किटोरीपेलेंट हा प्रयोग यापूर्वी राज्यस्तरावर सादर करण्यात आला होता. या प्रयोगातून मच्छर व त्या संबंधित होणाऱ्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपायासाठी नैसर्गिक पद्धतीने उपायोजना करण्यासाठी सदर प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण व मांडणी करण्यात आली. प्रयोगाची मांडणी करण्यासाठी देऊळगाव राजा शिक्षण संस्थेचे विज्ञान शिक्षक श्री एस एल बोरकर व श्री सुभाष तिडके यांनी याबाबत आगस्त यास मार्गदर्शन केले.
डब्ल्यू एच ओ मार्फत डासांवरील उपाय करता व आरोग्य संबंधित उपाययोजनांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. हरबल मॉस्किटो रीपेलेंट या प्रयोगातून नैसर्गिक पद्धतीने अतिशय स्वस्तात व उत्तम रीतीने डासांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते हे सदर प्रयोगातून दाखविण्यात आले आहे. या प्रयोगाचा खर्च अतिशय निम्न व सर्वसामान्यांना परवडणारा असल्यामुळे निश्चितच हा प्रयोग सर्वसामान्यांसाठी जीवन संजीवनी देणारा ठरणार आहे. अगस्त्यने यापूर्वीही राज्यस्तरावर मल्टी लेयर फार्मिंग तसेच विज्ञान विषयासंदर्भात अतिशय किफायतशीर व सर्वसामान्यांना लाभ देणारे प्रयोग यापूर्वी सादर केले असल्यामुळे त्याच्या प्रयोगाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. रासायनिक मॉस्किटो रीपेलेंट मुळे वृद्ध लहान मुले व सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अपायकारक परिणामांना आळा घालून नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या शेतीपूरक व नैसर्गिक उपाय योजना करून अगस्तने सर्वसामान्यांना वरदान ठरणाऱ्या उपयुक्त व सुरक्षित मच्छर प्रतिबंधक उपाययोजना शोधल्यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
या प्रयोगासाठी अगस्तचे व त्याच्या पालकांचे देऊळगावराजा शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक श्री आर बी कोल्हे सर, पर्यवेक्षक श्री जाधव सर, कनिष्ठ सहाय्यक श्री राठोड सर, विज्ञान शिक्षक वाय. आर. गव्हाळे सर, श्रीमती पूनम सूर्यवंशी मॅडम, कुमारी मुंडे मॅडम, श्री पडघान सर, श्री परदेशी सर, श्री लढा सर, यांनी अगस्त्य व त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन केले आहे.
देऊळगाव राजा विज्ञान शिक्षक संघटना व देऊळगाव राजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर यांचे अगस्त्य व त्याच्या कुटुंबीयांना विशेष मार्गदर्शन मिळालेले आहे. तसेच देऊळगावराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांनी अगस्त व त्याच्या कुटुंबीयांना याप्रसंगी शुभेच्या व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments