Advertisement

तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथील वृद्धांना जिवनावश्यक साहित्याचे दान करुन चि. युवराज 🎂🎂 आणि चि.मिताली🎂🎂 यांचा वाढदिवस संपन्न*

*तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथील वृद्धांना जिवनावश्यक साहित्याचे दान करुन चि. युवराज 🎂🎂 आणि चि.मिताली🎂🎂 यांचा वाढदिवस संपन्न* 
=====================

   एक कवि म्हणतो....

धम्मदिप हा *मानवतेचा*, जगताची प्रेरणा....
आकाश आमुचे,धरणी आमुची,
विश्वची आमुचे सारे..
प्रेम-मैत्रीची बंधुभावना,
फुलवी नवजिवना..
महाकारूणीक तथागताला हिच खरी🙏🙏 वंदना...

     खरोखरच  मानवालाच *केंद्रबिंदू* मानून बुद्धाने आपल्या *धम्माचा पाया* रचला आहे. म्हणूनच  "मानवसेवा हाच धम्म"  असे विधान केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बौद्ध धम्माच्या याच *आदर्शावर* आपली वाटचाल करीत *भारतमाता अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव आयु.नानासाहेब जाधव* यांनी आपला मुलगा *चि.युवराज* तसेच *भारतमाता अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कोषाध्यक्ष आयु.कैलास इंगळे साहेब* यांनी आपली नात *कु.मिताली* यांचा वाढदिवस🎂 अगदी साध्या पद्धतीने आणि चंगळवादी भोगवादी संस्कृतीला फाटा देत *तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर* येथील वृद्धांना जिवनावश्यक साहित्याचे *दान* करून साजरा केला.  

        यावेळी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक *आयु.प्रशांत डोंगरदिवे* आणि त्यांच्या पत्नी आयुष्यमानिनी *रूपालीताई प्रशांत डोगरदिवे* यांनी वृद्धाश्रमाविषयी माहिती दिली. आपल्या जवळच्यांनीच दूर केलेल्या या वृद्धांची मनोभावे सेवा करताना पाहून मन भरून आले. अशा या निराधारांची सेवा करणे यापेक्षा कोणतेही मोठे  *धम्म कार्य* असू शकत नाही याची जाणीव याप्रसंगी निश्चितच झाल्याशिवाय राहिली नाही.

      याप्रसंगी लुंबिनी बुद्ध विहार , बुलढाणाचे सक्रिय सदस्य आयु. शंकर गवई सर,आयु.सुरेश घेवंदे साहेब, भारतमाता अर्बनचे अध्यक्ष आयु.विजय वानखडे साहेब हेही हजर होते.


Post a Comment

0 Comments