Advertisement

राजकीय सुडबुद्धीने माझे धाकटे बंधू माणिकराव वाघ यांचेवर कारवाई.शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ...

राजकीय सुडबुद्धीने माझे धाकटे बंधू माणिकराव वाघ यांचेवर कारवाई.शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ...
जळगाव जामोद प्रतिनिधी...

माणिक वाघ यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषापोटी करण्यात आली आहे असा आरोप उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनी दि १४ सप्टेंबर रोजी बाजार समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
एका तक्रारदार नागरिकाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेचे नगर अभियंता व इतर कर्मचारी हे माणिक वाघ यांच्या घरी गेले असताना त्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली याप्रकरणी नगर परिषदेचे रवि पारस्करनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली असून माणिक वाघ यांच्यावर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दिनांक १२ सप्टेंबर रोजी नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे रवी पारस्कर व नगर रचनाकार विद्या अहिरे हे अतिक्रमण बांधकाम संबंधांमध्ये कोणतीही पूर्व सूचना लेखी किंवा तोंडी न देता माणिक वाघ यांच्या घरी गेले तेव्हा माणिक वाघ हे घरी नव्हते तेव्हा रीता माणिक वाघ यांना कर्मचारी म्हणाले की तुमचे अतिक्रमण पायऱ्यांचे आहे ते आताच्या आता काढा नाहीतर जेसीबीने पूर्ण घर तोडून टाकण्यात येईल. घरी गेले त्यावेळी अधिकाऱ्यांनी स्वतःचा परिचय दिला नाही व ते कुठल्या विभागाचे आहेत हे सांगितले नाही.सौ रिता वाघ यांनी माहिती माणिक वाघ यांना दिल्याने ते ताबडतोब घटनास्थळी हजर झाले व त्यांनी चिडून जाऊन रवी पारस्कर यांच्यासोबत लोटपाट केली व त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. नगरपरिषदेच्या १९६५ च्या नियमाप्रमाणे कुठल्याही नागरिकांची तक्रार आली असता संबंधित अतिक्रमणधारकांना नियमांप्रमाणे नोटीस देऊन आपल्या जागेचे मालकी हक्काचे कागदपत्रे व बांधकामा बाबत नगर परिषदेमध्ये हजर राहण्याकरता लेखी सूचना दिने हे बंधनकारक असताना सुद्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी नियमाप्रमाणे न वागता चुकीच्या पद्धतीने अतिक्रमणा बाबत कर्मचाऱ्यांना पाठवले त्यामुळे वरील घटनेला मुख्य अधिकारी जबाबदार आहेत आणि राजकीय दबावाखाली येऊन मुख्याधिकारी यांनी संपूर्ण नगरपरिषद कर्मचाऱ्यासह मोठा  पोलीस बंदोबस घेऊन माझ्या भावाच्या घरी जाऊन माझ्या भावाची पत्नी व मुलीवर दबाव टाकला. माझ्या भावाचे कोणतेही अतिक्रमण नाही या उलट जळगाव जामोद परिसरामध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे त्याची बाजारभावाने किंमत कोटीच्या जवळपास आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या शेतामध्ये सुद्धा अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. नगर परिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर सुद्धा बांधकामे झालेली आहेत हे सर्व नगरपरिषद संगनमत करून त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण करून अतिक्रमणधारकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवा-जमवी त्यांनी केलेली आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी माझ्या भावाला समाजकंटक म्हटले आहे समाजकंटक कशाला म्हणतात याचा त्यांनी खुलासा करावा तसेच जोपर्यंत दोषी अधिकारी व कर्मचारी यांना शासन निलंबित करून कारवाई करत नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.
______________________
दिनांक १२ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद नगर परिषदेच्या अधिकारी रचनाकार विद्या अहिरे व स्थापत्य अभियंता रवी पारस्कर एका तक्रारीच्या अनुषंगाने मालीखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असता त्या ठिकाणी माणिक वाघ यांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच तलवारीने जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहेत सदर प्रकरणी आरोपीवर गुन्हे दाखल झालेले आहेत..
नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ सुरज जाधव...

Post a Comment

0 Comments