Advertisement

सजनपुरी ग्रामपंचायत मध्ये शिव जयंती साजरी न केल्यामुळे रोष व्यक्त करत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिले निवेदन*

*सजनपुरी ग्रामपंचायत मध्ये शिव जयंती साजरी न केल्यामुळे रोष व्यक्त करत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिले निवेदन*
       आम्ही, सजनपुरी येथील समस्त ग्रामस्थ आणि 'सकल हिंदू समाज' या पत्राद्वारे आपले लक्ष एका गंभीर विषयाकडे वेधून इच्छितो.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आणि परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये (ज्यात ग्रामपंचायतींचा समावेश होतो) राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणे बंधनकारक आहे. असे असतानाही, सजनपुरी ग्रामपंचायतीने यावर्षी (१९ फेब्रुवारी २०२६) शिवजयंती साजरी करण्यास टाळाटाळ केली आहे किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. ग्रामपंचायतीसारख्या जबाबदार संस्थेने अशा प्रकारे शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे आणि कोट्यवधी शिवभक्तांच्या भावना दुखावणे, ही अत्यंत संतापजनक बाब आहे.
आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१. सदर प्रकरणी सरपंच /ग्रामसेवक यांचे वर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी 
२. शासनाचा निधी असतानाही जयंती का साजरी केली गेली नाही, याचा लेखी खुलासा मागवण्यात यावा.

जर या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर 'सकल हिंदू समाज' आणि शिवभक्तांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद!
टिप :- सोबत ग्रामपंचायत मधील शिवजयंती साजरी न केल्याचे फोटो जोडले आहेत.
प्रतिलिपी :- मा. गट विकास अधिकारी साहेब,
पंचायत समिती खामगाव, जि. बुलढाणा.


Post a Comment

0 Comments