Advertisement

​खामगावात रंगणार शिवजयंतीचा सोहळा; 'युवाशाहीर' विक्रांतसिंह राजपूत यांच्या पोवाड्यांचे आयोजन*खामगांव/(संतोष आटोळे)

*​खामगावात रंगणार शिवजयंतीचा सोहळा; 'युवाशाहीर' विक्रांतसिंह राजपूत यांच्या पोवाड्यांचे आयोजन*
खामगांव/(संतोष आटोळे)
​      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने खामगाव शहरात भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'छत्रपती युवा मंच, खामगाव' यांच्या वतीने आयोजित हा सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा उद्या शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता नगर परिषद शाळा क्र. ६, टॉवर चौक, खामगाव येथे पार पडणार आहे.​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवचरित्रावर आधारित प्रबोधनपर पोवाडे आणि स्फूर्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम. प्रख्यात 'युवाशाहीर' विक्रांतसिंह सज्जनसिंह राजपूत आपल्या वीररसपूर्ण आवाजात रायांचा इतिहास उलगडणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाद्वारे तरुण पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.​

'छत्रपती युवा मंचाच्या' वतीने सर्व शिवप्रेमी, समाज बांधव आणि भगिनींना या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "सेवा, सहकार्य आणि समर्पण" या ब्रीदवाक्याला स्मरून आयोजित या सोहळ्यामुळे खामगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments