*राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर मध्ये अनोख्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी.*
१९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी स्थानिक राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर मध्ये सकाळी अत्यंत पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला.
सर्वप्रथम संस्थाध्यक्ष राणा अशोककुमारजी सानंदा यांनी शिवरांयाची मूर्ती स्वतः हातात घेऊन शिव दिंडी यात्रेची सुरवात केली .ढोल ताशे पथकाच्या समवेत श्रीमंत छत्रपती श्री.शिवाजी महाराजांची दिंडी यात्रा शेगाव रोड पासून ते शाळेपर्यंत शेकडो विध्यार्थ्यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय च्या घोषणा देत शिव दिंडी यात्रेचे शाळेत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत कुंकू लावून फुले उधळत आरती ओवळली. त्यानंतर शाळेच्या आवारात ढोल ताश्याच्या पथकाने नाशिक ढोल त्यानंतर विविध प्रकारच्या चाली वाजवीत दिंडीचे स्वागत करून त्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती संस्थाध्यक्ष राणा अशोक कुमार जी सानंदा यांचे हस्ते व शाळेचे प्राचार्य संजय शर्मा सर यांचे हस्ते शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.त्यानंतर सर्वप्रथम वर्ग सातव्या वर्गाच्या मुलींनी पोवाडा गाऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर क्रीडा शिक्षक गुणेश तायडे सर यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील शौर्यगाथा विध्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितली.
शिवरांयाचे शासन त्यांनी शिकवलेली सर्व धर्म समभाव ची उदाहरणे दिली. सोबतच शिवरायांचे आचार, विचार प्रत्येकाने अंगीकृत करण्याचा सल्ला आपल्या भाषणातून दिला.त्यानंतर वर्ग १ ते ९ च्या विध्यार्थ्यांनी विविध वेशभूषेतील शिवरांयाचे सुंदर देखावे व नृत्य सादर केले सोबतच महाराजांच्या जीवनावर भाषणे दिली आणि शिवरायांची जीवणगाथा या विषयावर भाषण स्पर्धेत शाळेतील जवळपास ८२ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर शाळेचे प्राचार्य संजयजी शर्मा सर यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत हिंदवी स्वराज्य स्थापन केलेल्या कार्याची विध्यार्थ्यांना माहिती आपल्या भाषणातून दिली.त्यानंतर संस्थाध्यक्ष राणा अशोककुमारजी सानंदा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या शौर्याची गाथा विध्यार्थ्यांना सांगत आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण सुद्धा नसतो असा महत्वाचा उपदेश दिला सोबतच महाराजांचे अष्ट प्रधान मंडळ आणि छत्रपती शिवरांयांचे शासन याबद्दल माहिती सांगितली म्हणूनच छत्रपती शिवरायांना रयतेचा राजा म्हणत असत असे आपल्या भाषणातून विध्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. भाषणाच्या शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मनाचा मुजरा केला.
त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निधी सांगळे, विधी काळे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका शिल्पा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शुभम मोरे,विशाल तिवारी यांचे सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले. असे प्रसिध्दी प्रमुख कल्याणसिंग वतपाळ यांनी कळविले आहे.
0 Comments