Advertisement

मुख्य संपादक तथा जेष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल यांनी दिले मा. ना. प्रतापरावजी जाधव यांना विविध मागण्यासाठी निवेदन*खामगांव/(संतोष आटोळे)

*मुख्य संपादक तथा जेष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल यांनी दिले मा. ना. प्रतापरावजी जाधव यांना विविध मागण्यासाठी निवेदन*
खामगांव/(संतोष आटोळे)
      खामगाव नगरपरिषदेकडून लागणारा मालमत्ता कर हा हॉस्पिटल करिता अत्यावश्यक जनसेवा (Public Service)म्हणून घरगुती वापरापेक्षा कमी व्हावा तसेच खामगाव नगरपरिषदेने मालमत्ता करात केलेली नियमबाह्य आणि जुलमी करवाढ रद्द करण्यात यावी.
                 तसेच कित्येक वर्षापासून खामगाव शहरात विविध क्षेत्रात तज्ञ असलेले डॉक्टर्स हे आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून रात्रंदिवस रुग्णांना सेवा देत आहे. खामगावतील जनतेला याचा खूप लाभ होत आहे. आधीच डॉक्टर बनण्याकरिता शिक्षण घेताना भरपूर पैसा खर्च करावा लागतो त्यानंतर त्यांना डिग्री प्राप्त होते. रुग्णालय करिता पर्यायी जागा उपलब्ध नसल्याकारणाने त्यांना बँकेचे कर्ज काढून रुग्णालय बांधावे लागते त्याकरिता त्यांना बँके कडून लोन काढून अवाजवी व्याजाचा भरणा करावा लागतो. त्या उपरही नगरपरिषद हॉस्पिटलला भरमसाठ असा वाणिज्य वापराचा जास्तीत जास्त मालमत्ता कर लावत आहे. डॉक्टर्स लोकांना रुग्णालय चालविणे कठीण झाले आहे तरी रुग्णालयाला वाणिज्य वापराचा कर न लावता अत्यावश्यक जनसेवा  (public Service) घरगुती वापरापेक्षा कमी असलेला मालमत्ता कर लावण्याचे निर्देश नगरपालिकेला द्यावे.महावितरण कंपनी सुद्धा हॉस्पिटलला लागणाऱ्या विजेसाठी(Public Service) कमी दर आकारत असते. तसेच नगरपरिषदेने मालमत्ता करत नियमबाह्य आणि जुलमी वाढ करून नागरिकांना वेठीस धरून ज्या नोटिसा बजावल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या.

             आपण डॉक्टर्स मंडळीचे आणि खामगावच्या जनतेचे पालक आहात या नात्याने वरील दोन्ही बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तसे निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे अशी नम्र विनंती निवेदनात नमूद केली आहे.

Post a Comment

0 Comments