Advertisement

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे मराठी गौरव भाषा दिन साजरा*खामगांव/(संतोष आटोळे)

*जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे मराठी गौरव भाषा दिन साजरा*
खामगांव/(संतोष आटोळे)
         दिनांक 27 फेब्रुवारी रोजी
 विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने 21 जून 2013 रोजी मराठी गौरवभाषा दिन साजरा करण्याचे आदेश काढले. त्या दिवसापासून 27 फेब्रुवारी रोजी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे मराठी गौरव भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा गुंजकर एज्युकेशन हब चे अध्यक्ष प्रा रामकृष्ण गुंजकर सर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिवा सो सुरेखा गुंजकर मॅडम, तसेच गुंजकर कॉलेजचे प्राचार्य सतीशजी रायबोले सर व जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स चे प्राचार्य रवींद्र जी मांडवेकर सर, उपप्राचार्य संतोषजी अल्हाट सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.     


               मराठी गौरव भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मराठी कविता, मराठी भाषेवर प्रभावी भाषण मराठी नाटिका सादरीकरण करून प्रेक्षकाचे मन जिंकली. सरते शेवटी अध्यक्ष भाषणामध्ये प्रा रामकृष्ण गुंजकर सरांनी  कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments