Advertisement

खामगांव-जालना रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार; केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट*

*खामगांव-जालना रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार; केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट*

*बुलढाणा दि.17 (जिमाका) :* खामगांव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रिय रेल्वे अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल यांचा पाठपुरावा सुरू असून या रेल्वे मार्गासंदर्भात अंतिम मंजुरातीची  बातमी लवकरच बुलढाणेकरांना मिळणार आहे.

  बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्वकांशी असा  खामगाव जालना रेल्वे  मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार  प्रतापराव जाधव यांच्यावतीने सातत्याने रेल्वेमंत्र्याकडे या रेल्वेमार्गासंदर्भाचा पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे मार्गामुळे   जिल्ह्याच्या विकासालाही गती  मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50 टक्के आर्थिक निधीची तरतूद संदर्भात पाठपुरावा सुरु आहे.  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बाबत सकारात्मकता दर्शवली आहे. 



 *रेल्वे मार्गासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्याने प्रयत्न*

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सन  2009 मध्ये प्रथमच निवडून गेल्यानंतर  खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जालना रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते. लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला होता.  त्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरात मिळाली. त्यानंतर हा रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आला आणि  केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही 50% निधीची तरतूद करून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे या  रेल्वेमार्ग सातत्याने पाठपुरावा करीत  आहेत.  केंद्र सरकारचा 50% हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची  भेट घेतली आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे .या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊन गोड बातमी जिल्हा वासियांना मिळणार आहे

Post a Comment

0 Comments