Advertisement

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या मागणीला यश* *बुलढाणा जिल्ह्यात उज्वला गॅस योजना अंतर्गत १६ हजार १७७ लाभार्थ्यांना मिळणार उज्वला गॅस कनेक्शन* खामगाव/(संतोष आटोळे

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या मागणीला यश*
 *बुलढाणा जिल्ह्यात उज्वला गॅस योजना अंतर्गत १६ हजार १७७ लाभार्थ्यांना मिळणार उज्वला गॅस कनेक्शन*
 खामगाव/(संतोष आटोळे)  मागील अनेक वर्षांपासून  प्रलंबित असलेले उज्वला गॅस योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना त्वरित उज्वला गॅस योजनेअंतर्गत नवीन कलेक्शन मिळावे याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिनांक ३/१०/२०२५ रोजी पत्र लिहून जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्वरित गॅस कनेक्शन मिळावे अशी अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. तसेच संबंधित सर्व विभागाला आपल्याकडून आदेश देण्यात यावे यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करून  उज्वला गॅस योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांना महत्त्वाच्या मुद्द्याकडे प्रधानमंत्री यांचे लक्ष केंद्रित केले.


 या पत्राची दखल घेतली प्रधानमंत्री कार्यालय अंतर्गत थेट बुलढाणा जिल्ह्याचे निरीक्षक यांना बुलढाणा जिल्हा करता १६ हजार १७७ नवीन कनेक्शन प्राप्त झाले आहेत.त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे उज्वला गॅस योजनेअंतर्गत आरक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून लवकरात लवकर संबंधित सर्व लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे.  यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना पीएम स्वनिधी योजना तसेच लाडकी बहिण योजना अशा अनेक योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा व आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून  देण्यासाठी प्रयत्न केला व कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. एखादी सामाजिक संघटना ही कुशल नेतृत्वाच्या आधारे जनसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे असे  नागरिकाकडून बोलल्या जात आहे.  उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित एजन्सीकडे आधार कार्ड घेऊन जाऊन आपले गॅस कनेक्शन मिळून घ्यावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments