Advertisement

उपमुख्यमंत्री ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देशातील सर्वाधिक 2,17,675 मताधिक्क्याने विक्रमी विजय संपादन केल्याबदद्ल सानंदांनी श्रींची मुर्ती भेट देवुन केले अभिनंदन*

*उपमुख्यमंत्री ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देशातील सर्वाधिक 2,17,675 मताधिक्क्याने विक्रमी विजय संपादन केल्याबदद्ल सानंदांनी श्रींची मुर्ती भेट देवुन केले अभिनंदन*  
  मुंबई ः- महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत देशातील सर्वाधिक 2,17,675 मताधिक्क्याने विक्रमी विजय संपादन केल्याबदद्ल खामगाव विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दि.26 मे 2026 रोजी मुंबई येथील त्यांच्या देवगिरी बंगला येथे ना.सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी सानंदांनी त्यांचा श्री संत गजानन महाराजांची मुर्ती भेट देवुन सुनेत्राताईंचे शाल व पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व श्रींचा प्रसाद व अंगारा दिला.याप्रसंगी श्री संत गजानन महाराज की जयचा गजर करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव शहर कार्याध्यक्ष केशव कापले उपस्थित होते.आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान यश आपणांस मिळो व पक्ष संघटन अधिक मजबुत होवो, जनसेवेसाठी आपल्याला सुदृढ व निरोगी आयुष्य लाभो अश्या शुभेच्छा देवुन संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपण शेगाव येथे यावं अशी विनंती याप्रसंगी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली असता सुनेत्राताईंनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी व बुलढाणा जिल्हयाला लवकरच भेट देईल व तारीख तुम्हाला कळवेल असा शब्द सानंदांना दिला.तसेच याप्रसंगी 

सानंदांनी सुनेत्राताईंसोबत बुलढाणा जिल्हयातील विविध समस्यांबाबत चर्चा केली व विविध शिर्षकाखाली विकास निधी मिळणेबाबतचे अनेक निवेदने दिली असता त्यास सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताईंनी दिला.

Post a Comment

0 Comments