हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळातील शेतकरी दोन वर्षा पासून अनुदानापासून वंचित आहे शेतकरी तलाठी कार्यालयात आणि सेतू केंद्रावर फेऱ्या मारत आहेत त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे.
तेल्हारा तालुक्यातील आडगाव बु आणि हिवरखेड महसूल मंडळात पूर्ण तेल्हारा तालुक्यात सन 2022-23 सप्टेंबर आणि अक्टोम्बर मध्ये अतिवृष्टी झाली होती यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरळहू 13500 रु आणि फळबाग 36000 रुपये हेक्टरी मदद देण्याची घोषणा केली होती ही मदद अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली. मात्र ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आले नाही असे शेतकरी मददती पासून वंचित आहे त्यांना अनुदान केव्हा मिळणार
असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे
सेतू केंद्रावर ई -केवायसी केल्यानंतर या शेतकऱ्यांना अद्याप मदद मिळालेली नाही त्यातही आधार प्रामाणिकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदद केव्हा मिळेल, असा प्रश्न आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
प्रतिक्रिया
बरेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेत लिंक नसल्याने मदद मिळाली नाही शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर आधार प्रामाणिकरण करतांना आपला आधार लिंक बँकेत तपासून E-KYC करावी
सेतू केंद्र संचालक
शहेजाद खान हिवरखेड
प्रतिक्रिया
दुष्काळग्रस्त मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांकडे राज्य सरकारचा दुर्लक्ष आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकार दरबारी काहीच दखल घेतली जात नाही
संदिप इंगळे, माजी सरपंच
2022 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते सरकार ने तातडीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देऊ असे आस्वाशन दिले होते परंतु अजून मदद मिळाली नाही यादीत नाव आले नाही
धनंजय गावंडे
शेतकरीघि
0 Comments