निमखेड येथे प्रशासनाने केली नुकसानीची पाहणी

देऊळगाव राजा : तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर निमखेड शिवारात झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची,व फळबागांच्या पडझडीची पाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांनी ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गारपिटीने झालेल्या भयावह परिस्थितीची पाहणी केली.
तालुक्यात रविवारी रात्री अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले.सर्वाधिक नुकसान झालेल्या गोळेगाव तुळजापूर नंतर निमखेड शिवारात झालेल्या नुकसानीची तहसीलदार श्याम धणमने, गटविकास अधिकारी श्री माहोर, तालुका कृषी अधिकारी श्री कच्छवे, तलाठी श्री बरांडे, पंढरीनाथ जायभाये,ग्रामसेवकबाळू तिडके यांनी निमखेड परिसरात द्राक्ष चिकू, डाळिंब फळबागाची झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच संजय बाबासाहेब कव्हळे,माजी सरपंच तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कव्हळे, यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रशासनासमोर आपल्या भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते लक्ष्मण कव्हळे यांनी झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.शासनाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तात्काळ सरसकट मदत द्यावी अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
0 Comments