Advertisement

ग्राम वडशिंगी येथील रस्त्याचे काम होत आहे नित्कृष्ठ दर्जाचे उपविभागीय बांधकाम अभियंता, यांना दिलेली निवेदन

ग्राम वडशिंगी येथील रस्त्याचे काम होत आहे नित्कृष्ठ दर्जाचे उपविभागीय बांधकाम अभियंता, यांना दिलेली निवेदन
प्रतिनिधी जळगाव जामोद 
ग्राम वडशिंगी येथील शेतरस्त्याचे होत असलेल्या नित्कृष्ठ कामाबाबत. कैलास ज्योतीराम भगत व इतर शेतकरी यांनी ग्राम वडशिंगी ता जळगांव जा येथे श्री वंसत गावंडे यांचे घरापासून काजेगांव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सूरू आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगांव जामोद यांच्या नियंत्रणात व कार्यक्षेत्रात सूरू आहे. तरी सदर काम हे नित्कृष्ठ दर्जाचे होत आहे. सदर काजेगांव रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करता मातीवरच मिटटी पसरवून काम करण्यात येत आहे. शासनाचे निर्देश असतांना सूध्दा संबंधीत ठेकेदाराने सदर कामावर कामाचा माहीती दर्शविणारा फलक लावलेला नाही, कामावर वापरात येणारी गिट्टी, मटेरियल हे नित्कृष्ठ दर्जाचे आहे. कामाच्या ठिकाणी अभियंता उपस्थित नाही, रस्त्याची सफाई न करता मातीवरच गिट्टी टाकून काम करण्यात येत आहे. सदर नित्कृष्ठ होत असलेल्या कामाबाबत उपस्थित ठेकेदारास विचारणा केली असता आम्हीच आहो की, रस्ता करत आहे अन्यथा फक्त गड्डे भूजावयाचे आहेत असे सांगण्यात येत आहे. तरी सदर कामाबाबत आपण वेळीच लक्ष देवून संबंधीत ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद केले आहे

Post a Comment

0 Comments