Advertisement

बुलडाण्यात राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ८ जून रोजी. यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न.

बुलडाण्यात  राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ८ जून रोजी. 
यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न.
खामगाव (प्रतिनिधी), महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने ३१ मे  ते १४ जून २६ या कालावधीत राज्यातील बुलडाणा जिल्ह्यासह ३५ जिल्ह्यामध्ये राज्यमाता गोमाता  संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचे ८ जून रोजी बुलडाणा जिल्ह्यातील (चिखली) बुलडाणा येथे आगमन होणार आहे. तत्पूर्वी  जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगाव राजा या गावात या यात्रेचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातील गोप्रेमी, गोशाळा संचालक, नागरीक  व प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. या यात्रेचे नेतृत्व गोसेवा आयोगाचे अध्यक्ष  शेखर मुंदडा, आयोगाचे सदस्य उद्धव दिवाकर नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत गुप्ता, परेश शाह, संजय भोसले करणार आहेत.
या राज्यमाता गोमाता  संवाद यात्रेच्या नियोजना संदर्भात २२ मे रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकी चे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात  आले होते. यावेळी गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धव दिवाकर नेरकर, आयोगाचे सदस्य सचिव डॉ श्यामकांत पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन दुग्धविकास डॉ अमित कुमार दुबे, अशोक अग्रवाल, रवींद्र सिंघ ठाकूर, दुर्गेश घरत, नंदू दलाल यांची उपस्थिती होती. यावेळी बुलडाणा जिल्ह्यात ८ जून रोजी येत असलेल्या राज्यमाता गोमाता  संवाद यात्रेची गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर व डॉ अमित कुमार दुबे यांनी यात्रेच्या कार्यक्रमाची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी या यात्रेसाठी प्रशासनाकडून लागणारी मदत देण्याची ग्वाही देऊन वेळप्रसंगी आपण या यात्रेत स्वतः सहभागी होनार आहे असल्याचे सांगितले. सदर बैठकीचे संचलन  अमोल साठे यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. सचिन हागे यांनी केले. या बैठकीला मोहन निमरोथ, विनोद कोकाटे, विठ्ठल चौहान, पुरुषोत्तम हाके, डॉ आडे, रमेश चांडक, राजू तायडे, प्रवीण राठोड, देविदास देशमुख, श्रीहरी गुंजकर,  इंदल राठोड, यांची उपस्थिती होती.

राजमाता गोमाता संवाद यात्रेचा शुभारंभ पुणे येथून ३१ मे ला राज्याच्या पशुपालन मंत्री ना. पंकजा मुंडे व उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  या यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा असून राज्यात ६००० किलोमीटर प्रवास करून ३५ जिल्ह्यात जाईल. या यात्रेत जवळपास १००० गोशाळा, १५००० गोरक्षक गोपालक व शेतकरी यांच्याशी संवाद साधेल.  

यात्रेचा मुख्य उद्देश
राजमाता गोमाता संवाद यात्रेचा मुख्य उद्देश या यात्रेच्या  मार्गातील विविध गावामधील नागरिकांना देशी गोवंशाचे धार्मिक, आर्थिक, सामाजिक व वैज्ञानिक महत्व आणि  गो आधारित शेती, गोमय उत्पादने, पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. गोशाळाना स्वावलंबी बनविणे, संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायद्याची, कडक अंमलबजावणी बाबत जन जागृती करणे, गोशाळा संचालकाना  योजनांची माहिती देणे, पशुसंवर्धन व गोशाळा मध्ये अधिक समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न, देशी गोवंश पालन पोषण संदर्भात जनजागृती करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धव दिवाकर नेरकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments