Advertisement

कदमापूर येथे अधिक मासनिमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता**माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतला महाप्रसादाचा लाभ* खामगाव/(संतोष आटोळे )

*कदमापूर येथे अधिक मासनिमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता*
*माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*
 खामगाव/(संतोष आटोळे )   तालुक्यातील कदमापूर येथे अधिक मासनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाला दि.21 मे 2026 पासून प्रारंभ झाला,संपूर्ण सप्ताहभर गावामध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.या सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ तसेच रात्री कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागातून आलेल्या नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व महाराजांनी आपल्या प्रभावी वाणीमधून भक्तांना अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला.सप्ताहामध्ये ह.भ.प. किशोर महाराज काळे, ह.भ.प. पुखराज महाराज बावस्कार, विनोदाचार्य अरुण महाराज लांडे, ह.भ.प. साध्वी दुर्गाताई सोळंके, शिवव्याख्याकार शिवाजी महाराज झांबरे, रामायणाचार्य पंढरीनाथ महाराज देशमुख, ह.भ.प. मधुकर महाराज जोगदंड तसेच ह.भ.प. गणेश महाराज हुंबाड यांचे कीर्तन व प्रवचन कार्यक्रम संपन्न झाले.
  सप्ताहासाठी मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य प्रेमनाथजी महाराज, ह.भ.प. विकास महाराज वाठोडी आणि ह.भ.प. देविदास महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि टाळकरी यांच्या सुमधुर भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या श्रीमद्‌‍ भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवार दि.28 मे 2026 रोजी भक्तीमय वातावरणामध्ये उत्साहात सांगता झाली. याप्रसंगी हभप गणेश महाराज हुंबाड,महागाव यांचे सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत काल्याचे किर्तन पार पडले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी या श्रीमद्‌‍ भागवत सप्ताहाला भेट देवुन ग्रंथ पुजन केले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे उपस्थित होते.यावेळी आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी हभप विलास महाराज वाटाणे, हभप देविदस महाराज बघे,कदमापूरचे माजी सरपंच पवन पवार,डॉ.भास्करराव भोसले,समाधानजी लेवाडकर,माधवराव दारमोडे,माणिकराव गव्हाळे,गोपाल गव्हाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी दररोज अन्नदान करणाऱ्या विविध दान दात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित महाप्रसादाचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला.यावेळी सांगता कार्यक्रमानिमित्त गावातून ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीत महिला, युवक, नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषाने कदमापूर परिसर दुमदुमून गेला.  सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील समस्त नागरिक, वारकरी मंडळी, युवकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments