*आज हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-अजहाची नमाज अदा केली*
खामगाव /(संतोष आटोळे ) आज २८ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता सजनपुरी येथील ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहाची नमाज अदा केली. फाटकपुरा मशिदीचे पेश इमाम हाफिज सरफराज खान साहेब यांनी नेतृत्व करुन ईद ची नमाज पठण केली ईदच्या नमाजानंतर, हाफिज सरफराज खान साहेब यांनी खुतबा दिला नंतर सामूहिकरीत्या दुआ(प्रार्थना) मागितली. त्यामध्ये त्यांनी देशात आणि खामगाव शहरात शांतता व सलोखा नांदावा, एकमेकांमध्ये प्रेम, स्नेह आणि बंधुभाव टिकून राहावा, आपल्या मातृभूमीचे, हिंदुस्तानचे दहशत आणि भीतीपासून रक्षण व्हावे, जगातील सर्व मानवते चे रक्षण करावे तसेच वीर जवानांचे रक्षण करावे,आजारी लोकांना आरोग्य लाभावे, अशा सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.
याशिवाय, पावसाळा सुरू व्हावा आणि आशीर्वादांचा वर्षाव व्हावा यासाठीही प्रार्थना करण्यात आल्या. नमाजानंतर, मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदगाह नंतर मुस्लिम बांधवांनी स्थानिक बर्डे प्लॉट येथील कब्रस्तानवर जाऊन आपल्या नातेवाईकांच्या कबरींसाठी प्रार्थना केली. ईदगाहमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यांचे दुकान उभारण्यात आले होते. जिथे मुलांनी भरपूर खरेदी केली. ईदगाह आणि शहरातील विविध परिसरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
आला होता. ईदगाहच्या नमाजापूर्वी, मुस्लिम बांधवांनी सकाळी ६:३० ते ८:३० दरम्यान शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज अदा केली.
0 Comments