*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दर्जेदार विकासकामे करून परिसराचा कायापालट करू*
........*माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*चांदमारी चौक येथे 25 लक्ष रु खर्च करून बांधण्यात संत रोहिदास महाराज पुतळा सौंदर्यीकरण कामाचे थाटात भूमिपूजन*
खामगाव /(संतोष आटोळे ) चांदमारी फैल भागात मोठ्या प्रमाणात कष्टकरी चर्मकार समाज बांधव भगिनी राहतात म्हणून या ठिकाणी दर्जेदार सौंदर्यकरणासह श्री संत रोहिदास महाराजांचा आकर्षक पुतळा असावा यासाठी आपण बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मकरंदआबा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीचे माध्यमातून पुतळा स्थापनेसाठी 25 लक्ष रुपयांचा विकास निधी दिला असून या माध्यमातून आपल्या सर्वांना स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचे दर्जेदार काम करून संत रोहिदास महाराजांचा आकर्षक पुतळा बसविण्यात येईल सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभागातील इतर समस्या सोडवून परिसराचा कायापालट करण्यात येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
बुधवार दि.17 जून 2026 रोजी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून प्रभाग क्रमांक 7 मधील चांदमारी चौक परिसरात संत रोहिदास महाराज यांच्या आकर्षक पुतळ्यासह व्यासपीठ बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,नगरसेविका सौ. गायत्री तासतोडे,चर्मकार समाजाचे नेते प्रीतमभाऊ माळवंदे , रवी माळवंदे,विनोद माळवंदे , माजी नगरसेवक राणा अमेयसिंह सानंदा, आनंद गायगोळ, महेंद्रसिंग राठोड, निलेश तासतोडे,केशव कापले,रामकाका देशमुख,विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक देशमुख,निलेश इर्शिद आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, पालकमंत्री मकरंद आबापाटील यांनी बुलढाणा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खामगाव विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 20 कोटी रुपयांचा विकास निधी दिला असून त्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागामध्ये विकासाचा झंझावात सुरू आहे, यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दर्जेदार विकासकामे सुरू राहतील. पालकमंत्री यांच्या विकास निधीतून चांदमारी चौक परिसरात संत रोहिदास महाराजांचा व्यासपीठासह आकर्षक पुतळा बसविण्यात येणार आहे , या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कामाची एजन्सीदेखील निश्चित झालेली आहे, खामगाव नगरपालिकेकडून कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर लवकरच या परिसरात सर्वांना अभिमान वाटेल असा आकर्षक पुतळा बसविण्यात येईल असे सानंदा यांनी सांगितले.
सर्वप्रथम राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मान्यवरांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले असता ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तद्नंतर संत रोहिदास महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते माल्यार्पण करुन विधिवत पूजा अर्चा करून माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते फीत कापून व नगरसेविका सौ. गायत्री तासतोडे यांच्या हस्ते कुदळ मारून संत रोहिदास महाराज व्यासपीठ बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांच्या पुतळा व व्यासपीठ बांधकामासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबदद्ल चर्मकार समाज बांधवांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा पुष्पहार देवुन सत्कार केला व त्यांचे आभार मानले.यावेळी संत रोहिदास महाराज की जय, हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह की जय, जय भवानी-जय शिवाजी अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला श्याम मोरे,अशोक जसवानी,हरिभाऊ गायकवाड,सुधाकर माने,पंकज पुरी,अतुल झरेकर, संतोष गवळी,भावेश शिंदे,नरेंद्र मस्के,नारायण गायकवाड,शैलेश तासतोडे,चेतन मस्के,गजानन केकान,भीमाशंकरआप्पा गोबरे, रतन गोडेकर,सतीश खरात,ललीत हिवाळे,क्रिष इर्शिद,गजानन चिमनकार,छगन माळवंदे,मार्तंड ब्रदर,रोहिदास मस्के,अंकुश माळवंदे,सचिन घुमरे,अहेमद खान,गोपाल पाटील यांच्यासह चांदमारी फैल परिसरातील चर्मकार समाज बांधव व महिला भगिणी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments