Advertisement

योगीराज ज्ञानपीठ अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंताचा गौरव सोहळा संपन्न;* *कष्टाला प्रामाणिकतेची जोड दिल्यास यश निश्चितच,------ *ठाणेदार किशोर तायवाडे.*

*योगीराज ज्ञानपीठ अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंताचा गौरव सोहळा संपन्न;*
 *कष्टाला प्रामाणिकतेची जोड दिल्यास यश निश्चितच,
------ *ठाणेदार किशोर तायवाडे.*     
योगीराज बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित 
योगीराज ज्ञानपीठ अँड ज्युनिअर कॉलेज शहापूर येथे उच्च माध्यमिक *(HSC)* व माध्यमिक *(SSC)* *परीक्षा 2026* मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला, दर्जेदार शिक्षण आणि शिस्तीच्या जोरावर संस्थेने यंदाही निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे.    
  या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान श्री वसंत जी भट्टड (संस्था उपाध्यक्ष) यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच मार्गदर्शन म्हणून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर तायवाडे साहेब, श्री श्यामजी चांडक अकोला, श्री महेंद्रजी  पुरोहित अकोला, श्री किसनजी पुरोहित अकोला, श्री सतीशजी राठी अकोला, श्री खंडेलवालजी अकोला, श्री महेशजी राठी अकोला, 
 श्री प्रदीपजी गावंडे सर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) श्री प्रभुदास सर, श्री सोपानजी वाडेकर, रामेश्वरजी चतरकार, उपस्थित होते.
 आपल्या भाषणात किशोर तायवाडे साहेबांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता कौशल्य आत्मसात करावी . तर श्री प्रदीप गावंडे सर यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठावरून श्री जय गजानन कोचिंग सेंटरचे संचालक श्री गजानन नवथळे सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर बद्दल माहिती देऊन अल्पदरात जय गजानन अकॅडमी मध्ये *NEET* 👩🏻‍🎓 *JEE*  👩🏻‍🎓 *CET* 👩🏻‍🎓व *स्पर्धा परीक्षा* याबद्दल योग्य शिक्षण दिल्या जाते असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले 
ज्येष्ठ व्यावसायिक श्री श्यामजी चांडक यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व प्रथम येणाऱ्या पाच मुलींना स्कॉलरशिप देण्याचे जाहीर केले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर के राठी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा संकल्प मांडला संस्थेच्या सचिव सौ सुनीता राठी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या  यशात मोलाचा वाटा असणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचा गौरव श्री महेशजी राठी, प्रदीप गावंडे सर वसंजी भट्टड यांनी केला तर ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य सोपान  वि. नवथळे सर, मुख्याध्यापिका सौ. माधुरी दाभाडे मॅडम व आकाश निंबाळकर सर यांचे नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी वर्षभर घेतलेला जादा (अधिकच्या) तासिका आणि सराव परीक्षामुळे हे शक्य झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नाचे यावेळी कौतुक करण्यात आले, यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यशाचे श्रेय संस्थेचे शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले सरते शेवटी सूत्रसंचालन श्री गजानन तिडके सर आणि आभार प्रदर्शन शातनंद वि. नवथळे सर यांनी केले 

कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments