Advertisement

कर्तव्याच्या ध्यासापुढे उष्णतेची लाट फिकी; तब्बल २५७ कुटुंबांचे सर्वेक्षण अवघ्या अडीच दिवसांत पूर्ण*

*कर्तव्याच्या ध्यासापुढे उष्णतेची लाट फिकी; तब्बल २५७ कुटुंबांचे सर्वेक्षण अवघ्या अडीच दिवसांत पूर्ण* 

*१४ तासांचा महामॅरेथॉन थरार: कडक उन्हात खामगावच्या प्रगणकाने 'घरगणने'चा रचला  आदर्श!* 

 *खामगाव (प्रतिनिधी):* 
सध्या संपूर्ण भारतात कमालीची उष्णतेची लाट असून तापमान उच्चांकी पातळीवर आहे. परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितीतही 'घर यादी गट क्रमांक ०२७७, कदमापूर' येथील प्रगणक  राजेश वासुदेव कोगदे यांनी एक 'सुपरह्युमन' कामगिरी करून दाखवली आहे. कोगदे यांनी अवघ्या अडीच दिवसांत सकाळी ६ ते सायंकाळी ८ पर्यंत सलग १४ तास न थकता काम करत तब्बल २५७ कुटुंबांचे घरगणनेचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या विक्रमी कामगिरीने  लोकसंख्या आणि सांख्यिकी क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
("जेव्हा तुम्ही कर्तव्यालाच आपला ध्यास बनवता, तेव्हा कोणतंही संकट हे संकट राहत नाही, तर त्या संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळते. ऊन प्रचंड होते, पण घरगणनेचे काम वेळेत पूर्ण करणे हे माझे पहिले ध्येय होते," अशी भावना कोगदे यांनी व्यक्त केली.

 *राजेश कोगदे* 
 *प्रगणक 277, कदमापूर*)

Post a Comment

0 Comments